Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : 9 वर्षाच्या चौकशीनंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik Crime : भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याबाबत २६ ऑगस्ट २०१५ रोजी तुषार कासार यांनी तक्रार अर्ज केला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याबाबत २६ ऑगस्ट २०१५ रोजी तुषार कासार यांनी तक्रार अर्ज केला होता. तब्बल नऊ वर्षाच्या चौकशीनंतर मंगळवार (ता.२३) रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तुषार कासार यांनी त्यांच्या त्यांचे काका संशयित दिलीप तुकाराम कासार यांचा काठे गल्ली येथील फ्लॅट १९ लाख ५० हजारास त्यांच्याकडून खरेदी केला होता. (After 9 years of investigation case filed in police station )

त्यासाठी अधिकृत दुय्यम निबंधक कार्यालयात व्यवहार झाला होता. त्यातील ३ लाख ७५ हजार धनादेशद्वारे काकांना आगाऊ दिले. उर्वरित १५ लाख ७५ हजारांचे बँकेचे कर्ज घेतले. मूळ खरेदीखत दिलीप कासार यांच्या नावाने होते. कर्ज काढण्यासाठी तेच खरेदीखत बँकेत जमा असल्याने त्यांच्या नावाने बँकेने रकमेचा धनादेश(ड्राफ्ट) दिला. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या काकाकडे फ्लॅटचा ताबा देण्याची विनंती केली.

प्रथमत: त्यांनी मुलीचा विवाह झाल्यानंतर ताबा देण्याचे सांगितले. त्यानंतर तब्येत बरी नसल्याचे सांगितले. अशी विविध कारण देत फ्लॅटचा ताबा देण्यास टाळाटाळ केली. तीन वर्षाचा कालावधी उलटला. यानंतर पुन्हा त्यांनी ताबा देण्याची विनंती केली असता संशयित दिलीप तुकाराम कासार यांनी आत्महत्या करून तुमचे नाव घेईन. अशी धमकी दिली.

दरम्यान संशयित काकाने त्याच फ्लॅटवर परस्पर अन्य बँकेचे कर्ज घेतले असल्याची माहिती उघड झाली. २६ ऑगस्ट २०१५ रोजी त्यांनी संशयिताविरुद्ध लेखी तक्रार अर्ज केला. अर्जावरून चौकशी होऊन तब्बल ९ वर्षानंतर मंगळवार (ता. २३) रोजी भद्रकाली पोलिस ठाण्यात पुतण्याच्या तक्रारीवरून काका विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Evidence Law: भारतात १३५ वर्षांनंतर कायद्यात मोठा बदल! आता स्क्रीनशॉटही कोर्टात वैध पुरावा ठरणार; नवा बँकिंग पुरावा कायदा काय आहे?

IND vs SL 1st Test: भारताचा सराव सामना उद्यापासून! Live कुठे पाहता येणार, किती वाजता मॅच सुरू होणार? श्रीलंकेला बसलाय मोठा धक्का

UPI Payment Charges: 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट केल्यास चार्ज लागणार? RBI गव्हर्नरांची मोठी माहिती

अरे सुरेखा परत आली रे! जे दिग्याला नाही जमलं ते मामाने केलं, पुन्हा एकदा अंकुश चौधरीसोबत दिसली रिचा, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Marathi News Live Updates : सर्व दोष केंद्र सरकारवर ढकलणे योग्य नाही - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT