Crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : कौटुंबिक कलहातून अपर अधीक्षकावर गुन्हा

Latest Crime News : कौटुंबिक वादातून मुलास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा इंदिरानगर पोलिसात दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती येथील अपर पोलीस अधीक्षकांविरोधात कौटुंबिक वादातून मुलास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा इंदिरानगर पोलिसात दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (case filed against ACB Additional Superintendent due to family feud)

अमरावती येथील ‘लाचलुचपत’चे अपर अधीक्षक अनिल पवार असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. इंदिरानगर पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित पवार यांचे पाथर्डी फाटा परिसरातील हरिविश्व सोसायटीत फ्लॅट आहे. शुक्रवारी (ता.११) पवार हे या ठिकाणी आले असता, पत्नीसमवेत त्यांचे वाद झाले.

त्यावेळी त्यांचा मुलगा अभिषेक (२५) याने इंदिरानगर पोलिसांशी संपर्क साधला असता, पोलिसांचे पथक तातडीने दाखलही झाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यात समझोता घडवून आणत निघून गेले. मात्र पोलीस जाताच, संतापलेल्या पवार यांनी मुलास मारहाण केली. (latest marathi news)

त्याचे डोके भिंतीवर आपटून गळा दाबला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी अभिषेकला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित पवार हे पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धोनीचा 'Beast' मोड, ७५ लाखांची गाडी चालवताना दाखवून दिलं आर्मीप्रेम....तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

SCROLL FOR NEXT