Naresh Karda esakal
नाशिक

Nashik Naresh Karda Case : बांधकाम व्यावसायिकाविरोधात आणखी एक गुन्हा; जामिनावर असलेल्या कारडा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Crime News : कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कारडा यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेने कारडा यांना अटकही केली होती. मात्र सध्या जामिनावर असलेल्या कारडांविरोधात सेवानिवृत्त कर्नलची ३० लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा उपनगर पोलिसांत दाखल झाला आहे. (Nashik Crime Another case against builder anresh karda news)

जेल रोड परिसरातील निवृत्त कर्नल राकेश कालिया (रा. हरिविहार, जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, नरेश जगुमल कारडा, अनुप सुभाषचंद्र कटारिया यांसह इतर संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा उपनगर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, कारडा यांच्या एका गृहनिर्माण प्रकल्पात कर्नल कालिया यांनी फ्लॅट बूक केला होता.

त्यासाठी तीस लाखांचा धनादेशही दिला होता. या गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष कारडा यांनी दिले. मात्र, गुंतवलेली रक्कम परत न करता, तसेच फ्लॅटचाही ताबा न दिल्याने फिर्यादींनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. १६ फेब्रुवारी २०१९ ते ६ मे २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तपास करीत आहेत.  (latest marathi news)

गेल्या वर्षी तीन गुन्हे

नोव्हेंबर २०२३ मध्ये मुंबई नाका पोलिसांत एक कोटी व उपनगर पोलिसांत चार कोटी आणि अठरा लाख, असे तीन गुन्हे संशयित नरेश कारडा यांच्याविरोधात दाखल आहेत. याप्रकरणी शहर आर्थिक गुन्हे शाखेने कारडा यांना अटकही केली होती. पोलिसांनी तपासात ‘हार्डडिस्क’ जप्त केली. तर शंभरपेक्षा जास्त तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी कारडा यांना ११ नोव्हेंबर २०२३ ला जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT