Police officers along with suspects arrested by Ambad police. esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : स्क्रॅप घोटाळ्याचा खोलात जाऊन तपास : शेखर देशमुख

Nashik News : स्क्रॅप मटेरिअलच्या घोटाळ्यात कमी व जास्त वजनाच्या बनावट पावत्या बनवून फसवणूक करणाऱ्या सहा संशयितांना एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : स्क्रॅप मटेरिअलच्या घोटाळ्यात कमी व जास्त वजनाच्या बनावट पावत्या बनवून फसवणूक करणाऱ्या सहा संशयितांना एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली. (Nashik Fraud Crime)

अंबड औद्योगिक वसाहतीत प्रशांत अरुण संगई यांच्या इलेक्ट्रो फॅब, इनोव्हेशन, तसेच उरजयंत इंजि. प्रा. लि. या तीन कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांतील निघणारे लोखंडी स्क्रॅप मटेरिअल संशयित अभिषेक शर्मा हा खरेदी करीत होता. शर्मा याने इलेक्ट्रो फॅब कंपनीतील कामगारांच्या मदतीने अंबड लिंक रोड येथील इंडस्ट्रीयल वे ब्रिज, महाराष्ट्र वे ब्रिज तसेच एक्स्लो पॉइंट.

सातपूर- अंबड लिंक रस्त्यावरील जानकी वे ब्रिज या तीन वजन काट्यांवर काम करणाऱ्यांबरोबर कट रचून फिर्यादी प्रशांत अरुण संगई यांच्या इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन प्लॉट नं. जी ४८ व प्लॉट नं. बी ८१ तसेच उरजयंत इंजि. प्रा. लि., प्लॉट नं. बी ८१ या तीन कंपन्यांमधून निघणाऱ्या लोखंडी स्क्रॅप मटेरिअलच्या एकाच गाडीच्या वेगवेगळ्या वजनाच्या दोन वजन पावत्या तयार करून कमी वजनाची पावती ही फिर्यादींना दिली जायची.

मूळ वजनाची पावती ही स्क्रॅप विक्रेता स्वतःकडे ठेवायचा. अशा प्रकारे फिर्यादींना कमी वजनाची बनावट पावती देऊन स्क्रॅपचे कमी पैसे देऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी प्रशांत अरुण संगई यांनी चुंचाळे पोलिस चौकी येथे फिर्याद दिली. यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक. (latest marathi news)

पोलिस उपायुक्त (परिमंडळ-२) मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, अतुल पाटील, संदीप शेवाळे, पोलिस हवालदार अविनाश चव्हाण, पोलिस अंमलदार दिनेश नेहे, विजय सोनवणे, अर्जुन कांदळकर, जनार्दन ढाकणे, महेश सावंत यांनी तपास केला.

संशयितांना अटक

पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित अभिषेक शर्मा यास तत्काळ अटक करून फिर्यादी प्रशांत संगई यांच्या इलेक्ट्रो फॅब कंपनीतील दोन साथीदार जितेंद्र मिश्रा व गोपाल राणे, तसेच जानकी वे ब्रिजवरील कामगार रामलखन सिंग, महाराष्ट्र वे ब्रिजवरील ज्ञानेंद्रसिंग बाघेल तसेच इंडस्ट्रीअल वे ब्रिजवरील रवींद्र वर्मा यांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही वजनकाट्याच्या पावत्या बनविण्याचे मशिन जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Vidhan Bhavan Bomb Threat: विधानभवनात बॉम्बची धमकी! ई-मेलनंतर मुंबईत खळबळ; पोलिस-बॉम्ब स्क्वॉडची धावपळ, मोठी शोधमोहीम सुरू

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तापमान 40 पार जाण्याची शक्यता!

LPG Cylinder Price Hike : गॅस संकट गडद, जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती आहे LPG सिलिंडरचा दर ?

शुभमंगल सावधान! इशा डेचं धुमधडाक्यात लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

LPG Gas Crisis: पंधरा दिवस युद्ध चालल्यास गॅस संकट गडद; इंधन दरवाढीसह आयातीवर परिणाम साठेबाजी रोखण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT