Shankar Gosavi bribe taking Constable esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : कॅफेचालकाकडून लाच घेणाऱ्या लाचखोर सहायक उपनिरीक्षकाला कोठडी!

Crime News : अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षकास न्यायालयाने एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कॉलेजच्या आवारात असलेल्या कॅफे चालकास कारवाई करण्याबाबत धमकावत त्याच्याकडून अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षकास न्यायालयाने एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Nashik Crime Assistant Sub Inspector arrested by ACB marathi news)

शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड) असे संशयित लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोसावी यांनी नियमभंग करुन कॉलेज रोड परिसरातील कॅफे चालकास धमकावत दरमहा हप्ता बांधून घेतला होता.

कॅफे चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याने त्याच्या कॅफेत येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘प्रायव्हसी’ असावी म्हणून आडोसा केला होता. ही बाब हेरुन गोसावी यांनी सहा महिन्यांपूर्वी कॅफेचालकाकडे ‘तू कुंटणखाना चालवितोस, तुझ्यावर कारवाई करेन’ असा दम देत कॅफेवर कारवाई न करण्यासाठी दरमहा तीन हजार रुपयांचा हप्ता बांधून घेत वसूल केला. (Latest Marathi News)

कॅफेत कुठलाही गैरप्रकार चालवत नसल्याचे लाच का द्यावी, असे कॅफे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने बुधवारी (ता. ६) सापळा रचून हप्त्याचे अडीच हजार रुपयांची रक्कम घेताना दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती.

गोसावी हा आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असताना त्याने लाचखोरीचा प्रताप केल्याने पोलीस आयुक्तालयाने चौकशी सुरु केली आहे. येत्या दोन दिवसांत गोसावी यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT