Assistant Sub-Inspector Namdev Karwabhi Sonwane in Intermediate Crime Branch esakal
नाशिक

Nashik Police Attack Crime : पोलिस अंमलदारालाच चाकू खुपसला; दिंडोरी नाक्यावरील घटना

Latest Crime News : शहरात गुंडाराज सुरू असल्याच्या घटना सध्या घडत असून, पोलिसांचा धाकच उरला नाही की अशी शंका घेतली जाऊ लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंडित कॉलनीत सफाई कामगाराचा भल्या पहाटे खून, सातपूरमध्ये युवकाला प्राणघातक हल्ला, पंचवटीत अपहरण करून युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनांपाठोपाठ गुन्हेशाखेच्या अंमलदाराच्या पोटातच संशयिताने चाकू खुपसल्याची घटना घडली आहे. शहरात गुंडाराज सुरू असल्याच्या घटना सध्या घडत असून, पोलिसांचा धाकच उरला नाही की अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. (attack on police officer by knife at dindori naka )

विकी संजय जाधव उर्फ गट्या (रा. अवधुतवाडी, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. मध्यर्ती गुन्हेशाखेतील सहायक उपनिरीक्षक नामदेव कारवाभी सोनवणे (५ ७, रा. धात्रकफाटा, आडगाव शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित गट्या हा शुक्रवारी (ता. ४)रात्री हातात चाकू घेऊन अवधुतवाडी परिसरात नागरिकांमध्ये दहशत माजवत होता. त्यावेळी अंमलदार सोनवणे त्या रस्त्याने जात असताना त्यांनी संशयिताच्या हातातील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयितांना त्यांनाही न जुमानता प्रतिकार करू लागला.

तरीही सोनवणे हे त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत असताना संशयिताने चाकू सोनवणे यांच्या पोटात खुपसला आणि पळ काढला. जखमी झाल्याच्या अवस्थेमध्ये सोनवणे यांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले आणि पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक व्ही. ए. पडोळकर हे तपास करीत आहेत.

युवकाला धारदार हत्याराने हल्ला

पंचवटीतील कमलनगर येथे भांडणाची कुरापत काढून संशयितांनी एकावर धारदार हत्याराने वार करीत जखमी केले. किरण मधुकर सोनवणे (२७, रा. त्रिमूर्तीनगर, हिरावाडी रोड) याच्या फिर्यादीनुसार संशयित रामेश्वर, ओम व त्याचा साथीदार यांनी गुरुवारी (ता.३) रात्री साडेदहाच्या सुमारास कमलनगरमध्ये किरण यास, तुम्ही माझा मित्र रितेश, पिंटू पवार यास मारहाण के केली असे विचारून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, एकाने त्याच्याकडील धारदार हत्याराने किरणच्या पाठीवर वार करून जखमी केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

पेठरोडवरील अंबिकानगर येथून युवकाचे अपहरण करून गिरणारे परिसरात नेऊन त्यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिगंबर वाघ, रोहिदास ब्राह्मणे, व त्याचे साथीदारांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संगीता सुभाष चव्हाण (रा. क्रांतीनगर, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा अनिल हा त्याच्या मैत्रिणीसोबत पेठरोडवर असताना रिक्षातून आलेल्या संशयितांनी कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने त्याचे अपहरण केले.

त्यास गिरणारे येथील खंडेराव मंदिराजवळ नेऊन संशयित दिगंबर वाघ याने, तुला जास्त माज आला. तुझा विषयच संपवतो असे म्हणत त्यास जीवे ठार मारण्याच्या उद्ेदेशाने दोन्ही पायांवर गुडघ्याच्या खाली धारदार हत्याराने वार केले. तसेच, संशयित ब्राह्मणे व साथीदारांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल असून, उपनिरीक्षक नेमाणे हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT