break ATM machine  esakal
नाशिक

Nashik Crime News : ATM फोडण्याचा प्रयत्न असफल; सिक्युरिटी गार्डला मारहाण

Nashik Crime : सिन्नर-शिर्डी लगत असलेल्या मुसळगाव एमआयडीसी येथील सारस्वत बँकेचे एटीएम बुधवारी पहाटे फोडण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर-शिर्डी लगत असलेल्या मुसळगाव एमआयडीसी येथील सारस्वत बँकेचे एटीएम बुधवारी पहाटे फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पहाटे चार वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी मशीन फोडण्याचा प्रयत्न करून येथील सिक्युरिटी गार्डला मारहाण करण्यात आली आहे. चोरट्यांना रोकडचा कॅशवार्ड खोलण्यात अपयश आल्याने रक्कम वाचली. मात्र, चोरट्यांनी एटीएम मशीनचे नुकसान केले आहे. (Nashik Crime Attempt to break ATM failed security guard beaten up marathi news)

बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान अज्ञात चौघा चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश करत सुरक्षारक्षकास मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व एटीएम मशीन बाहेर ओढून काढली. चोरट्यांनी एटीएमची तोडफोड केली परंतू मशीनचा कॅशवार्ड उघडता न आल्याने त्यांना त्यातील रक्कम लांबविता आली नाही. सुरक्षारक्षकाने सकाळी सहा वाजता याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. (latest marathi news)

घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर, भगवान शिंदे, रोहित सानप, नवनाथ चकोर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहे. सीसीटीव्ही मध्ये सर्व दृश्य काहीच पुढील तपासासाठी पोलीस रवाना. एमआयडीसी परिसरात सारस्वत बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले.

मात्र, लॉकर खोलण्यात अपयश आल्याने त्यामधील रक्कम वाचली. या एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहे. त्या कॅमेऱ्यामध्ये चौघेजण कैद झाले आहे. यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याला सुरुवात केली आहे. गुन्हा नोंदवण्याचे काम सिन्नर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये सुरू असून तपासाचे चक्र फिरवण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

FDA चा छापा; ५५ हजाराचा गुटखा जप्त, पण मकोकाअंतर्गत गुन्हा नाही, तुकाराम मुंढेंचे आदेश असतानाही टाळाटाळ?

Latest Marathi News Live Update : बनावट सहीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडीचे पथक कोलकाता येथील राज्य विधानसभेत दाखल झाले

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT