Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : कसबे सुकेणे येथे दोघांचा बियरची बाटली मारून एकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

Crime News : गोकुळ सोनवणे त्यांना तुम्ही शिविगाळ का करता, असे म्हणत समजावुन सांगत असतांना त्याचा सनिष व गुड्डु यांना राग आला अन...

सकाळ वृत्तसेवा

ओझर : तुम्ही शिवीगाळ का करता, असे विचारून दोघा जणांना समजावुन सांगत असतांना त्याचा राग आल्याने दोघा जणांनी एकास बियरची बाटली डोक्यात व हातावर मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना कसबे सुकेणे येथे घडली.

गुरूवारी दिनांक 30 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गोकुळ रामकृष्ण सोनवणे राहणार मौजे सुकेणे, ता. निफाड हे कसबे सुकेणे येथील भगवती मोबाईल शॉपी जवळ उभे असतांना सनी कराटे व गुड्डु काळे राहणार कसबे सुकेणे, हे त्यांचे अँक्टिवा स्कुटीवर तेथे आले व पाटील काय आपले वाकडे करुन घेणार आहे, असे म्हणाल्यानंतर गोकुळ सोनवणे त्यांना तुम्ही शिविगाळ का करता, असे म्हणत समजावुन सांगत असतांना त्याचा सनिष व गुड्डु यांना राग आला.

तेव्हा दोघांनी संगनमत करुन सनी कराटे याने तु पाटील आहे काय ? तु काय करून घेणार, असे म्हणून सोनवणे यांना शिविगाळ करुन सनी कराटे याने गुड्डु काळे याच्या हातातील बिअरची भरलेली बाटली घेतली. तंव्हा गुड्डु काळे याने सोनवणे यांना पाठीमागुन शर्टाला धरुन सनीने सोनवणेच्या डोक्यात बाटली मारली व दुखापत केली.

तेंव्हा गुड्डु सनी यास म्हणाला डोक्यात नको मारु, पोटात खुपसुन टाक, अशी चिथावणी दिली असता सनी कराटे बीअरची फुटलेली बाटली सोनवणे यांचे पोटात खुपसण्याचा प्रयत्न केल्यावर सोनवणे यांनी प्रतिकार केला. तेंव्हा ती बाटली सनी कराटे याने सोनवणे याच्या उजव्या हाताच्या दंडावर मारुन जबर दुखापत केली. (latest marathi news)

आज याचा मर्डर करुन टाकु, असे गुड्डु काळे म्हणाल्यानंतर सनी कराटे हा सोनवणेच्या डाव्या बाजुस छातीच्या जवळ बरगड्यावर वार करत असतांना सोनवणे याने त्याचा डावा हात मध्ये घातल्याने डाव्या हातास बीअरची बाटली मारुन गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर सनी कराटे व गुड्डु काळे यांनी सोनवणे यास आज तु वाचला पुढच्या वेळी गेम करु, असा दम दिला, अशी तक्रार नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी कराटे व काळे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक तुषार गरुड हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT