Crime News esakal
नाशिक

Nashik Crime : वडाळा रोडवर पैशाची बॅग खेचण्याचा प्रयत्न फसला; प्रसंगावधानामुळे बचावली 9 लाखांची रोकड

Crime News : वडाळारोडवर भरदिवसा ही घटना घडल्याने शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वडाळा गावातील व्यावसायिकाने बँकेतून रोकड काढून ते त्यांच्या दुचाकीवरून घराकडे परतत असताना दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्यांना रोखले आणि त्यांच्याकडील ९ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

परंतु व्यावसायिकाने प्रसंगावधान राखल्याने संशयितांनी बॅग हिसकावताना ती खाली पडली. त्यामुळे संशयिताना पळ काढावा लागला. वडाळारोडवर भरदिवसा ही घटना घडल्याने शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे राहिले आहे. (Nashik Crime attempt to pull money bag on Wadala Road marathi news)

हनीफ अफसर कुरेशी (रा. रेहनुमा नगर, वडाळा रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा डेअरी फार्मचा व्यवसाय आहे. बुधवारी (ता. ६) दुपारी ते बँकेत गेले आणि त्यांनी बँकेतून ९ लाखांची रोकड काढून बॅगेत ठेवली. त्यानंतर ते त्याच्या दुचाकीवरून परत वडाळा रोडवरील घराकडे परतत होते.

दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते त्याच्या घरासमोर पोहोचले असता, त्याचवेळी पल्सर दुचाकीवरून दोघे संशयित आले आणि त्यांनी कुरेशी यांना रोखले. संशयित अनोळखी असल्याने कुरेशी यांना संशय आला परंतु त्याचवेळी संशयितांनी कुरेशी यांच्याकडील ९ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

सावध झालेल्या कुरेशी यांनी बॅग पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये संशयितांच्या हातून बॅग निसटली आणि रस्त्यावर पडली. तोपर्यंत आरडाओरडा झाल्याने संशयितांनी बॅग तशीच सोडून पळ काढला. भरदिवसा वडाळा रोडवर घडलेल्या या घटनेमुळे येथील व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. तसेच, परिसरात नाकाबंदी करीत वाहनांची तपासणीही केली गेली. परंतु संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. (Latest Marathi News)

दुचाक्या डिक्कीतून ५ लाख लंपास

पंचवटी कारंजा येथे अंबिका रेस्टॉरंटसमोर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने ५ लाखांची रोकड लंपास केली आहे. आशिष पंडित (रा. वसंत अपार्टमेंट, पंचवटी कारंजा) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता.६) बारा ते साडेबारा या दरम्यान सदरचा प्रकार घडला असून, याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांसमोर आव्हान

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये शहरात गुन्हेगारी वाढली आहे. जबरी चोऱ्या, हाणामाऱ्या, वाहनांची जाळपोळ, घरफोड्या यासारखे गुन्हे सातत्याने घडत असून, गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

"बॅग लिफ्टिंगप्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पथक तपास करीत आहे. लवकरच संशयितांना अटक केली जाईल."

- युवराज पत्की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई नाका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT