Sarkarwada police while detaining Baba Konkani. esakal
नाशिक

Nashik Crime News : बाबा कोकणी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात; जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाई

Crime News : शहरातून तडीपार झालेल्या बाबा कोकणीला सरकारवाडा पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातून तडीपार झालेल्या बाबा कोकणीला सरकारवाडा पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. (Nashik Crime Baba Konkani in police custody again news)

शहरातून तडीपार असलेला अब्दुल लतीफ यासीन कोकणी उर्फ बाबा (रा. २८१०, राजमहल बंगला, कोकणीपुरा, भद्रकाली, नाशिक) याने मार्चमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नाशिक मंडळ अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घातला होता. अर्धन्यायिक कामकाज सुरू असताना पाच ते सहा मालमत्तांच्या प्रकरणांवर हरकत घेत, कोकणी याने काही मालमत्ताधारकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही तक्रारदारांनी केला.

नाशिक तालुका तलाठी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे याविषयी तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कोकणीविरोधात पोलिस आयुक्तांकडेच तक्रार करत कारवाईचे आदेश दिले. सरकारवाडा पोलिसांनी कोकणीला ताब्यात घेत त्याच्यावर विविध तक्रारदारांच्या आधारे गुन्हा दाखल केला होता; पण न्यायालयात जामीन मंजूर झाल्यानंतर तो पुन्हा शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयात वावरताना दिसून आला.  (latest marathi news)

खरेतर पोलिस आयुक्तालयाने तडीपार असलेल्या व्यक्तींना शहर व जिल्हा हद्द सोडून बाहेर पाठविले आहे. असे असताना बाबा कोकणी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात राजरोस फिरताना दिसतो. विशेष म्हणजे, ज्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नाशिक मंडळ अधिकाऱ्यांच्या दालनात कोकणीने गोंधळ घातला होता त्याच दालनात पुन्हा शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा गोंधळ घालताना दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT