Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : घरगुती गॅसचा काळाबाजार करणारे अड्डे उदध्वस्त! शहर गुन्हे शाखेची म्हसरुळ, सातपूरमध्ये कारवाई

Crime News : याप्रकरणी म्हसरुळ, सातपूर पोलिसात गुन्हे दाखल करून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पेठरोडवरील अश्वमेघनगर आणि सातपूरमध्ये भंदुरे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका गोठ्याजवळ घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसचा काळाबाजार केला जात असताना पोलिसांनी छापा टाकून हे अड्डे उद्ध्वस्त केले. याप्रकरणी म्हसरुळ, सातपूर पोलिसात गुन्हे दाखल करून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Nashik Crime Bases of domestic gas black market destroyed City Crime Branch)

गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांच्या फिर्यादीनुसार, युनिट एकच्या पथकाला पेठरोडवरील अश्वमेध नगर परिसरातील किराणा दुकानाच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गॅसचा काळाबाजार सुरू असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, पथकाने छापा टाकला त्यावेळी संशयित धनराज सदानंद गणेशकर (१८, रा. पंचवटी), विशाल शांताराम भुसारे (३७, रा. शांतीनगर, मखमलाबाद रोड) व एक अल्पवयीन मुलगा मारुती ओम्नीमध्ये (एमएच १५ बीडब्ल्यू ५६५५) घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस भरताना आढळून आले.

संशयितांनी भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या सिलिंडरमधून इलेक्ट्रीक मोटार, नोझल पाइपचा वापर करून संशयित भुसारेच्या वाहनात गॅस भरणा केला होता. ओम्नीसह पोलिसांनी दोन सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार, नोझल पाईपसह गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे मशिन असा १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित तिघांविरोधात म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. (latest marathi news)

तसेच, गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला सातपूर परिसरातील भंदुरे जाणाऱ्या रोड परिसरात गॅसचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाने भंदुरे मळ्याजवळ नीलेश शेवरे यांच्या गोठ्याजवळ सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी संशयित शेखर विसपुते (४५, रा. मयुरेश्वर अपार्टमेंट, अशोक नगर, सातपूर) हा घरगुती गॅस सिलिंडरमधून एका वाहनात गॅस भरत असल्याचे आढळून आला.

पोलिसांनी विसपुतेकडून २३ भरलेले व रिकामे गॅस सिलींडर, १५ हजार रुपयांची इलेक्ट्रीक मोटार, ५ हजार रुपयांचा वजनकाटा, रोकड असा एकूण ७४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अंमलदार तेजस मते यांच्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT