beating esakal
नाशिक

Nashik Crime : दत्तनगरमध्ये 2 गटात राडा; अंबड पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा

Nashik Crime : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवसेंदिवस हाणामारीच्या घटनांवर थेट धारदार हत्यारांचा वापर करून जीवघेणे हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवसेंदिवस हाणामारीच्या घटनांवर थेट धारदार हत्यारांचा वापर करून जीवघेणे हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. अंबड परिसरातील दत्तनगरमध्ये दोन गटात झालेल्या मारहाणीमध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून, एकाच्या डोक्यात तर कोयत्याने वार करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दत्तनगरमध्ये शनिवारी (ता.१२) रात्री नऊ ते सव्वाबाराच्या दरम्यान, सदरची घटना घडली होती. ( beat in 2 groups in Datta Nagar in ambad )

यात एका गटातील संशयित मनोज भदाणे, गणेश भदाणे, किरण भदाणे, रवि भदाणे व दुसऱ्या गटातील कलीम बेग, तौफिक उर्फ पप्पु, अश्पाक व समीर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कलीम बेग याच्या फिर्यादीनुसार, दत्तनगरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांत दांडीया व गरबा खेळतांना कलिमच्या पायाचा धक्का मनाेज भदाणेला लागला असता, कुरापत काढून त्याने अश्लिल शिवीगाळ केली. तसेच, लाकडी दांड्याने डोक्यावर मारले. तर, किरण भदाणे याने धारदार कोयता कलीमच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली. यावेळी संशयित मनोज, रवि भदाणे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली.

दुसऱ्या गटातील रवी भदाणे याच्या फिर्यादीनुसार, भदाणे कुटुंब दांडीया संपवून घरी जात होते. ते गाेकुळ मेडिकलजवळ असताना, संशयित कलीम, ताैफिक, अश्पाक व समीर यांनी दांडीया खेळण्याच्या कारणावरून मनोजला अश्लिल शिवीगाळ केली. तेव्हा रवि भदाणे याने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अश्पाकने ‘तु जादा भाई बन रहा है, तेरा गेम ही बजाना पडेगा’, असे म्हणत कमरेला लावलेला धारदार चाकू काढून रवीला ठार करण्याच्या उ‌द्देशाने त्याच्या पोटाच्या दिशेने उगारला. मात्र, रवीने प्रसंगावधान दाखवत बाजुला झाला परंतु त्याच्या कमरेला दुखापत झाली. याप्रकरणी दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक निरीक्षक गणेश मुगले करीत आहेत.

रोकडोबा वाडीत टोळक्याचा धुडघूस

देवळालीगावातील रोकडोबावाडीत शनिवारी (ता १२) रात्री सव्वा बाराच्या सुमारास दुचाकी व रिक्षातून १० ते १२ जणांच्या टाेकळ्याने हातात कोयते घेऊन महिलांना मारहाण करीत धूडगूस घातला. अतिशबाजी मित्र मंडळात संशयित अक्षय पारचे, साहील सय्यद, अनिकेत देवरे, पीयूष शिंदे, राहुल तेलोरे, आदित्य बडे व त्यांचे सहा साथीदार मंडळात शिरले आणि ‘डीजे’ चालू करा असे म्हणत अक्षय पारचे व साथीदारांनी लता कैलास निकम यांच्यासह अन्य महिलांना व मुलगा अतिश निकम याला शिवीगाळ करून मारहाण केली. अक्षय पारचे याने कोयता काढून परिसरात राडा घालून एकालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल असून तपास हवालदार गजेंद्र बरेलीकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT