crime esakal
नाशिक

Nashik Crime News : मांजरगावात बॉम्ब तयार केले जातात! सायखेडा पोलिसांना निनावी फोन

Nashik Crime : गोदावरी नदीच्या लगत बॉम्ब तयार करण्यात येत असून ते बॉम्ब शिर्डी आणि पंचवटी येथे लावून स्फोट घडवून आणला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

चांदोरी : भर दुपारी सूर्य आग ओकत असताना सगळीकडे शांतता पसरली होती. उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे रस्ते निर्मनुष्य होते नेहमीच माणसांची वर्दळ असणाऱ्या सायखेडा पोलिस स्टेशन परिसरात शांतता होती. कर्मचारी आपापल्या कामात दंग होते तितक्यात 8459902483 या नंबर वरून डायल करून ११२ हेल्पलाईन वर फोन करून एक अज्ञात व्यक्तीने मांजरगाव शिवारात गोदावरी नदीच्या लगत बॉम्ब तयार करण्यात येत असून ते बॉम्ब शिर्डी आणि पंचवटी येथे लावून स्फोट घडवून आणला जाणार आहे असं सांगितले आणि सायखेडा पोलिसांची एकच धावपळ सुरु झाली.

पोलिस शिपाई मिलिंद शिरसाठ यांनी सदर कॉल वरील संभाषण ऐकले सायखेडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक विकास ढोकरे यांनी आपल्या सोबत तात्काळ कर्मचारी घेऊन मांजरगाव गाठले गावातील रस्ते नदीच्या परिसरात सदर कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला परंतु कोणीही संशयित आढळून आले नाही. कर्मचारी मिलिंद शिरसाठ यांनी फिर्यादी दिली निनावी फोन करणाऱ्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

Pune Weather: पुण्यात पुन्हा ढगांची दाटी; पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT