Burglary esakal
नाशिक

Nashik Crime News : बुटात चावी ठेवणे पडले महाग! लॅपटॉप गेला चोरीला; शहरात तीन घरफोड्या

Latest Crime News : बुटामध्ये ठेवलेल्या बंद फ्लॅटच्या चावीने फ्लॅट उघडून ७० हजारांचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. यश पांडुरंग झगरे (२०, रा. पुष्पक अपार्टमेंट, स्नेहनगर, म्हसरुळ) याच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. १३) दुपारी सदरचा प्रकार घडला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शिक्षणानिमित्ताने आलेल्या युवकाला बाहेर जाताना फ्लॅटची चावी बुटात ठेवून जाणे चांगलेच महागात पडले असून, त्याचा ७० हजारांचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. तर, नाशिकरोडला बंद घराच्या खिडकीचे गज कापून ऐवज चोरून नेला आहे. (Three burglaries in city)

बुटामध्ये ठेवलेल्या बंद फ्लॅटच्या चावीने फ्लॅट उघडून ७० हजारांचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. यश पांडुरंग झगरे (२०, रा. पुष्पक अपार्टमेंट, स्नेहनगर, म्हसरुळ) याच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. १३) दुपारी सदरचा प्रकार घडला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीसात गुन्हा दाखल आहे. तर, नाशिकरोड परिसरातील जय भवानी रोडवरील बंद घराच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी ९५ हजारांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली.

शकिलाबानू अब्दुल शेख (रा. आदित्य रो हाऊस, आडके नगर, जयभवानी रोड) यांच्या फिर्यादीनुसार, ५ तारखेला मध्यरात्री घरफोडी झाली. चोरट्यांनी घरातून ७ हजारांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. (latest marathi news)

म्हसरुळ हद्दीतील मानेनगरमध्ये बंद रोहाऊसचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. सोनल विनायक लाटे (रा. घरकुल रोहाऊस, मानेनगर, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.१३) अज्ञात चोरट्याने कडीकोयंडा व कुलूप तोडून घरातून २ लाखांची रोकड व चांदीचे दागीने असा २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

गोदामातून गोणी चोरीला

सिडकोतील गोदामात ठेवलेली चारोळीची गोणी संशयिताने त्याच्य गाडीत टाकून चोरून नेली. गणेश भिवा आटपाडे (२६) असे संशयिताचे नाव आहे. वैभव राजकुमार अग्रवाल (रा. सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे गोदामात व्यापारी चावाडी यांनी चारोळीच्या ९ गोण्या त्यांच्या गोदामात ठेवल्या होत्या. १० तारखेला दुपारी संशयिताने त्यातील एक ३० हजारांची एक गोणी गाडीत (एमएच १५ इजी २३२७) टाकून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT