Those who participated in the procession were arrested esakal
नाशिक

Nashik Crime News : पोलिसांनी सराईत गुंडांची मस्ती उतरवली 19 जणांना अटक! 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik News : मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर संशयितांची जंगी मिरवणूक काढत शरणपूर भागात दहशत निर्माण करणाऱ्या सराईतासह त्याच्या कारचालकास गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर संशयितांची जंगी मिरवणूक काढत शरणपूर भागात दहशत निर्माण करणाऱ्या सराईतासह त्याच्या कारचालकास गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. त्यामुळे जंगी स्वागत करवून घेणे सराईताला भोवले असून पोलिसांनी त्यांची शहरातून धिंड काढली. (Nashik Crime News)

हर्षद सुनील पाटणकर (२६, रा. बेथेलनगर, शरणपूर रोड) असे सराईताचे नाव असून त्याचा एसयूव्ही कारचा चालक नरेश ऊर्फ पवन माणिक कसबे (३१, रा. यशराज प्राइड, ध्रुवनगर) यालाही अटक झाली आहे. तडीपार करूनही वर्तनात सुधारणा न झाल्याने जुलै २०२३ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हर्षद पाटणकर याला वर्षभर तुरुंगात स्थानबद्ध केले होते. दरम्यान, मंगळवारी (ता. २३) पाटणकरची जेलमधून सुटका झाली.

त्यामुळे त्याचे जंगी स्वागत करण्यासाठी तडिपार मित्र संशयित गोपाल नागोरकर, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबिन्सन बत्तीसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळगे (सर्व रा. बेथेलनगर, शरणपूर) यांनी मिरवणुक काढली. दुपारी तीन वाजता एक्सयूव्ही ३०० (एमएच- १५- जीएक्स- ८७२१) कार बोलावून सनरुफमध्ये उभे राहून पाटणकरने मिरवणुकीत सहभाग घेतला.

त्याच वेळी त्याच्या कारच्या आजूबाजूला इतर कार व १० ते १५ स्पोर्ट बाईक, इतर दुचाकी व मोपेडस्वार साथीदार सहभागी झाले. या सर्वांनी परिसरात गोंगाट करून शिवीगाळ केली. शिवाय दुचाकी वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवून दहशत निर्माण केली. ही माहिती कळताच सरकारवाडा पोलिसांनी दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी संशयित पसार झाले. (latest marathi news)

त्यांचा शोध सुरु असतानाच हवालदार प्रशांत मरकड व पोलिस नाईक मिलिंदसिंग परदेशी यांना कार नरेश ऊर्फ पवन कसबे हा चालवीत असल्याचे कळाले. त्यांनी ही माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना कळविली. त्यानुसार तपास करून ध्रुवनगर परिसरात शोध घेतला असता पाटणकर व कसबे आढळून आले.

तसेच गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर १९ जणांना अटक केली आहे. तसेच एक चारचाकी वाहन व तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. हर्षल पाटणकर व त्याचा साथीदार या दोघांना अटक केली असून त्यांना पुन्हा कारागृहाची हवा खावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT