Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात

Crime News : १० हजाराची लाच घेतांना तालुक्यातील कुंदलगाव तलाठी विजय राजेंद्र जाधव यास लाचलुपपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले

सकाळ वृत्तसेवा

चांदवड : सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी १० हजाराची लाच घेतांना तालुक्यातील कुंदलगाव तलाठी विजय राजेंद्र जाधव यास लाचलुपपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. (Nashik crime Bribe talathi caught at chandwad marathi news)

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती १० हजाराची लाच स्विकारली. तक्रारदाराच्या आई, मामा तसेच मामांच्या मुली व मावशींनी कुंदलगाव येथील शेती वाटपासाठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.

कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव येथील गट नंबर ४१०, ४१२, ४१४ या गटातील ५०-५० गुंठे जमिनीवर तक्रारदाराची आई, मामा व इतर नातेवाईकांच्या नावांची सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी चांदवड तहसिलदारांकडे अर्ज केला होता. (latest marathi news)

अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तलाठ्याकडे देण्यात आला होता. या कामासाठी संशयित तलाठ्याने तक्रारदाराकडे पंचांसमक्ष लाच स्वीकारतांना त्यास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्‍वजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. पथकात हवालदार प्रणय इंगळे, अनिल गांगुर्डे, विनोद पवार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: नागपुरात विजांचा कडकडाटसह पावसाला सुरूवात...

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT