Nashik Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : म्हाडाच्या लाचखोर लिपिकाला 4 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!

Nashik News : म्हाडाच्या लाचखोर वरिष्ठ लिपिकाला नाशिक जिल्हा न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि १० हजारांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अहमदनगर येथील हुडकोतील गाळा नावावर करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या म्हाडाच्या लाचखोर वरिष्ठ लिपिकाला नाशिक जिल्हा न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि १० हजारांचा दंड ठोठावला आहे. कैलास भिकाजी शेळके (५४, रा. श्रीनाथ कृपा, हरिकुलनगर, पंचक, जेल रोड ) असे लाचखोर आरोपीचे नाव आहे. (Nashik Crime Bribery clerk of MHADA sentenced to 4 years hard labour)

अहमदनगर येथील तक्रारदार अशोक बकोरे यांचे वडिलांच्या नावे अहमदनगर येथे हुडकोत गाळा (क्रमांक ६८४) होता. तो गाळा तक्रारदारांच्या नावावर अभिहस्तांतरण (ट्रान्सफर) करायचा होता. त्यासाठी २२ मार्च २०१६ ला नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कार्यालयातील (म्हाडा) वरिष्ठ लिपिकाने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, पथकाने २२ मार्च २०१६ ला सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास गडकरी चौकातील म्हाडा कार्यालयातच लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली होती. (latest marathi news)

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश जे. एम. दळवी यांच्या समोर झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सचिन गोरवाडकर यांनी कामकाज पाहिले.

न्यायालयाने लाचखोर आरोपी शेळके यास दोषी ठरविले आणि ४ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी केला. तर, पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार प्रदीप काळोगे, महिला अंमलदार ज्योती पाटील यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात घेतले उपचार

सांगलीत ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! राँग साइडने चालवली स्कोडा, ६-७ वाहनांना धडक; अनेकजण जखमी

दुर्दैवी घटना! 'शेतीत मशागत करताना रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू'; कागल तालुक्यातील घटना, अचानक तोल गेला अन्..

CM Eknath Shinde: आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; स्थानिकमध्ये एकमेकांविरुद्ध लढलो म्हणजे शत्रू नाही

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

SCROLL FOR NEXT