Jailed esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : महावितरणच्या लाचखोर उपकार्यकारी अभियंत्याला पोलीस कोठडी; एक लाखांची स्वीकारली होती लाच

Crime News : येवल्यात लाचखोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : पिंपळगाव बसवंत येथे व्यावसायिकाकडून १ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या अभियंत्याच्या घरझडतीतून लाचलुचपत पथकाच्या हाती काय सापडले हे मात्र समजू शकलेले नाही. तसेच, येवल्यात लाचखोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Nashik Crime Bribery sub executive engineer of Mahavitaran jailed)

किसन भीमराव कोपनर (४४, रा. पार्क साईड, आडगाव शिवार, नाशिक) असे महावितरण कंपनीतील उपकार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. पिंपळगाव बसवंत येथील व्यावसायिकाचे इलेक्ट्रिक मीटर काढून घेऊन त्याठिकाणी इंडस्ट्रीयल इलेक्ट्रिकल मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात एक लाखांच्या लाचेची मागणी केली आणि शुक्रवारी (ता.५) पंचासमक्ष स्वीकारली.

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर कोपनर यास रंगेहाथ अटक करीत पिंपळगाव बसवंत पोलिसात गुन्हा दाखल केला. कोपनर यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (latest marathi news)

त्याचप्रमाणे, येवला येथील गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यासही शुक्रवारी (ता.५) २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. तसेच, भूसंपादनाचा ना हरकत दाखल्यासाठी ७०० रुपयांची लाच स्वीकारताना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जनार्दन रहाटळ यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी (ता.५) अटक केली होती. या दोघा लाचखोरांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत महागाईचा स्फोट! वडापावपासून चहापर्यंत... रेस्टॉरंट मालकांनी किंमती वाढवल्या, जाणून घ्या सध्याचे दर

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

SCROLL FOR NEXT