Burglary Crime esakal
नाशिक

Nashik Burglary Crime : ओझरला घरफोडी! रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा सव्वा दोन लाखांचा अैवज लंपास

Nashik Crime : आज्ञात चोरट्याने बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा व सेंटरलाँक तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटांतून रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले असल्याची घटना ओझर येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : ओझर येथील एका बंगल्यातील कुटुंब बाहेर गेले असताना व विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याची संधी साधत आज्ञात चोरट्याने बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा व सेंटरलाँक तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटांतून रोख रकमेसह 2 लाख 21 हजार सातशे 40 रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले असल्याची घटना ओझर येथे घडली. (Nashik Crime Burglary in Ozer)

शनिवार दिनांक 19 रोजी सांयकाळी साडेसहा ते रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान दशरथ बाजीराव फटांगळे राहाणार अँक्वा पार्क शेजारी माऊली बंगलो जुना सायखेडा रोड ओझर हे कुटुंबियासह जवळच्या नातेवाईकाकडे गेले होते त्याच दरम्यान ओझर येथील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता ही संधी साधून आज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या तारेच्या कुंपनावरुन उडी मारून कंपाऊंड मध्ये प्रवेश केला.

त्यानंतर मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा व सेंटरलाँक तोडून बंगल्यात प्रवेश करुन लोखंडी व लाकडी कपाटातून 13 हजार रुपये रोख रक्कमेसह सोन्याची लांब पोत, सोन्याचे पॅन्डल सोन्याचा नेकलेस, मनी मंगळसुत्राची लहान पोत, सोन्याची ठुशी. (latest marathi news)

3 नग चांदीचे शिक्के (नाणे) असा एकुण 2 लाख 21हजार 740 रुपयांचा अैवज चोरून नेला असल्याची तक्रार फंटागळे यांनी काल ओझर पोलिस ठाण्यात नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी आज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक वाय. व्ही. केंद्रे करत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

T20 WC, IND vs SA: अक्षर पटेलला संधी नाहीच; दक्षिण आफ्रिका संघात तब्बल ४ बदल; Super-8 सामन्यासाठी पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

Pune News: वाहनांची तपासणी आता अवघ्या सहा मिनिटांत;‘आरटीओ’चे स्वयंचलित चाचणी केंद्र एक मार्चपासून सेवेत, वेळेची हाेणार बचत!

Dive Ghat Pune Traffic Update: दिवेघाटात उद्या दोन तास वाहतूक बंद; आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील रुंदीकरणासाठी निर्णय!

SCROLL FOR NEXT