Jailed esakal
नाशिक

Nashik Crime : बसचालकाला मारहाण; आरोपीला कारावास

Latest Crime News : बसचालकाला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका वर्षाचा कारावासाची शिक्षा व ५ हजारांच्या दंड ठोठावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बसचालकाच्या कॅबिनमध्ये बसलेल्या आरोपीला पाठीमागे सांगण्यास सांगितले असता, त्याने बसचालकाला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका वर्षाचा कारावासाची शिक्षा व ५ हजारांच्या दंड ठोठावला आहे. अरबाज आयुब शेख (२०, रा रेणुकानगर, वडाळानाका. सध्या रा. अकोले रोड, संगमनेर, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. रामराव साहेबराव चव्हाण (राजगुरू बस आगार, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार, २ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ते नाशिकहून पुण्याला प्रवासी घेऊन निघाले. (bus driver was assaulted and accused was imprisoned )

त्यावेळी आरोपी बसचालकाच्या कॅबिनमध्ये बसला असता, त्यास त्यांनी पाठीमागे जाण्यास सांगितले. त्या रागातून आरोपीने बसचालक चव्हाण यांना मारहाण केली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल होता. तत्कालीन सहायक निरीक्षक एस.एस. वऱ्हाडे यांनी गुन्ह्याचा तपास करीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदरील खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.एम. बदर यांच्यासमोर चालला.

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अपर्णा पाटील, ॲड. बगदाणे यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले. आरोपीविरोधात आरोप सिद्ध झाल्याने न्या. बदर यांनी आरोपीला एका वर्षांचा साधा कारावास आणि ५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. महिला अंमलदार श्रीमती आर.जी. तांदळकर, श्रीमती व्ही.एस. सोनवणे, हवालदार रशीद शेख यांनी पैरवी अधिकारीम्हणून पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

T20 WC, IND vs ENG SF: अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात गेला, संजू सॅमसन म्हणालेला, अरे घाई नको करू... ! इंग्लंडच्या रणनीतीने हैराण

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : इस्रायलकडून इराणवर मोठे ड्रोन हल्ले

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

SCROLL FOR NEXT