social media crime esakal
नाशिक

Nashik Crime: सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल! माजी आयुक्तांचा व्हिडिओ प्रसारित; संशयितांचा शोध सुरू

Latest Crime News : या संदेशामुळे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या दोघा अज्ञात संशयितांविरोधात नाशिक शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शहराचे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचा २०२२ मधील प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडिओ संदेशाशी छेडछाड करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या संदेशामुळे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या दोघा अज्ञात संशयितांविरोधात नाशिक शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच, आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर व्हायरल केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. (case filed against those who spread offensive messages on social media)

शहर सायबर पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, एप्रिल २०२२ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय होते. त्यावेळी मनसेने मस्जिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन पुकारले होते. त्यासंदर्भात तत्कालीन पोलीस आयुक्त पांडेय यांनी प्रसार माध्यमांना मुलाखत देताना, कायदेशीर तरतुदी विशद केल्या होत्या. सदरचा व्हिडीओ ४ मिनिटे ४२ सेंकदांचा होता. परंतु अज्ञात संशयितांनी त्या मूळ व्हिडिओमध्ये छेडछाड केली आणि अवघ्या २४ सेकंदाचा व्हिडिओ व्हॉटसॲपवर व्हायरल केला आहे.

तसेच सध्या पांडेय हे आयुक्त नसताना या व्हिडिओद्वारे मुस्लिम समाजाच्या वेळी इतर धर्मियांना हनुमान चालिसाचे पठण करण्यास मनाई असल्याचा तो व्हिडिओ व्हायरल केला आहे. यामुळे दोन धर्मियांमध्ये असुरक्षिततेची व द्वेषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलीसात व्हिडीओत छेडछाडी व सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

"सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ कोणीही, कोणत्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर फॉरवर्ड करू नये. तसे केल्याच निदर्शनास आल्यास संबंधितांविरोधात कायदेशिर कारवाई केली जाईल."- सुभाष ढवळे, वरिष्ठ निरीक्षक, शहर सायबर पोलीस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT