Social Media Crime esakal
नाशिक

Nashik Crime : सोशल मीडियावरील त्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल! उपनगर नाक्यावर रास्तारोको करणाऱ्या चौघांना अटक

Crime News : आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यास जीवे मारण्यासाठीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर संतप्त जमावाने ३ एप्रिल रोजी नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर नाका येथे मध्यरात्री रास्ता रोको करीत, वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी चौघांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

तर, त्याचवेळी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यास जीवे मारण्यासाठीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. (Nashik Crime case registered in case of offensive post on social media news)

उपनगर परिसरातील एका समाजकंटकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे गेल्या ३ एप्रिल रोजी उपनगर पोलिस ठाण्यावर एका गटाने गर्दी करीत संशयिताविरोधात कारवाईची मागणी केली. उपनगर पोलिसांनी संशयिताला अटकही केली.

मात्र, संशयितांच्या जमावाने त्यानंतर उपनगर नाक्यावर येत अचानक रास्तारोको केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होता. उपनगर पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असून अन्य संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. (latest marathi news)

दरम्यान, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी संशयिताच्या विरोधात ९ समाजकंटकांनी सोशल मीडियावर संदेश व्हायरल केला होता. त्याचीही गंभीर दखल शहर पोलिसांकडून घेण्यात आली आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्या ९ खातेधारकाविरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या खातेदारांचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT