Chain Snatcher esakal
नाशिक

Nashik Crime News : तिघींच्या मंगळसूत्रावर चैनस्नॅचरचा डल्ला; आडगाव 2 तर, गंगापूरला 1 जबरी चोरीची घटना

Nashik News : आडगावात तासाभरात दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली तर गंगापूरला एका महिलेची पोत खेचून नेत चोरट्यांनी दीड लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : चोरी, घरफोड्यापाठोपाठ सोनसाखळी ओरबाडून नेण्याच्या घटना शहरात वाढल्या आहेत. आडगावात तासाभरात दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली तर गंगापूरला एका महिलेची पोत खेचून नेत चोरट्यांनी दीड लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. वाढत्या सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटनांवर आळा घालण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. (Chain Snatcher stolen 3 Mangalsutra)

आडगाव हद्दीत दोन घटना घडल्या आहेत. शकुंतला अशोक माळोदे (रा. आडगाव जुना बाजार) या २९ तारखेला दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास आडगावातील सार्वजनिक शौचालयाजवळ असताना दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेली.

तर दुसरी घटना आडगाव शिवारातील रामलीला मंगल कार्यालयासमोर २९ तारखेलाच सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेली. यात १ लाख २० हजारांच्या दोघींच्या सोन्याच्या पोती होत्या. (Latest Marathi News)

याप्रकरणी आडगाव पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसरी घटना गंगापूर रोड परिसरात घडली. भारती पुरषोत्तम रावत (रा. आर्चित झोडियाक, सिरीजमीडोज, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १) साकळी सातच्या सुमारास त्या ट्रिलॅन्ड ते हिराबाग या परिसरातून पायी जात होत्या.

त्यावेळी मोपेडवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ३५ हारांची सोन्याची पोत खेचून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT