Chain Snatching esakal
नाशिक

Nashik Crime News : इंदिरानगरला सलग दुसऱ्या दिवशी चैनस्नॅचिंग

Nashik Crime : शहर परिसरामध्ये गेल्या दोन दिवसात महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याच्या पाच घटना घडल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहर परिसरामध्ये गेल्या दोन दिवसात महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याच्या पाच घटना घडल्या आहेत. इंदिरानगर परिसरात एका रस्त्यावर दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेल्याच्या घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशी महिलेच्या मंगलसूत्रावर सोनसाखळी चोरट्यांनी (चैनस्नॅचिंग) डल्ला मारला आहे. एका पाठोपाठ घडलेल्या घटनांमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. (Nashik Crime Chain Snatching in Indiranagar marathi news)

तर दुसरीकडे सतत होणाऱ्या चैनस्नॅचिंगमुळे पोलिस सतर्क झाले असले तरी अद्यापही पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नसून सोनसाखळी चोरट्यांना रोखण्याचे आव्हान पोलिस प्रशासनापुढे आहे. वडाळा - पाथर्डी रोडवरील तुळजाभवानी नगरमध्ये सोमवारी (ता. ८) रात्री दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेले होते.

या घटनेला २४ तास होत नाही तोच, मंगळवारी (ता. ९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील स्वराज्य नगरमध्ये पुन्हा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना घडली आहे.

मंगल संजय पाटील (५०, रा. साईराम रो हाऊस, म्हाडा कॉलनी, स्वराज्य नगर, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, त्या स्वराज्य नगरमधील वक्रतुंड बंगल्यासमोर होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ५९ हजारांची सोन्याची शॉर्ट पोत बळजबरीने खेचून पोबारा केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना लागेना सुगावा

शहरात दोन दिवसात सहा चैनस्नॅचिंगच्या घटना घडल्या. परंतु अद्याप एकाही गुन्ह्याची उकल होऊ शकलेली नाही. पोलिस ठाण्यासह शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. परंतु अद्यापही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. दरम्यान, चैनस्नॅचिंगच्या घटना या शहराच्या उपनगरीय परिसरातील कॉलनी रस्त्यावर होत आहेत. कॉलनी रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याचा फायदा घेत संशयित चैनस्नॅचिंगचा डाव साधत आहेत. त्यामुळे कॉलनी परिसरातही पोलिस गस्तीची मागणी होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT