Vikhe patil School Dispute  esakal
नाशिक

Nashik Crime: संवेदनशिल विखे पाटील शाळेच्या केंद्रावर गोंधळ! पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात; माजी नगरसेविकेकडून दमदाटी

Crime News : कामटवाडा शिवारातील डॉ. विखे पाटील मेमोरियल स्कुल या शाळेमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र असून याठिकाणी २२ बुथ आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहर पोलिस आयुक्तालयातील सर्वाधिक मतदान बुथ असलेल्या कामटवाडा शिवारातील विखे पाटील शाळेच्या मतदान केंद्रावर दोघा कार्यकर्त्यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घातली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी माजी नगरसेविकेला केंद्रावर बोलावून घेतले असता, त्यांनीही पोलिसांनी वाद घातला. त्यावरून सेक्टर अधिकाऱ्यांच्या पथकाने दोघा कार्यकर्त्यांना ताब्यात घेत चौकशीसाठी अंबड पोलिसात नेले. यामुळे मतदान केंद्राच्या परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. (Nashik Crime Confusion at sensitive Vikhe Patil school center)

कामटवाडा शिवारातील डॉ. विखे पाटील मेमोरियल स्कुल या शाळेमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र असून याठिकाणी २२ बुथ आहेत. आयुक्तालय हद्दीतील हे सर्वाधिक बुथ असलेले मतदान केंद्र असल्याने ते संवेदनशील केंद्र म्हणून याठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच सकाळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट दिल्यानंतर सेक्टर अधिकारी व सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्याकडून सातत्याने याठिकाणी गस्त घातली जात आहे.

दरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले. त्यावेळी त्यांनी आतमध्ये जेवण देण्याचे कारण सांगितले. त्यावेळी पोलिसांनी आतील कर्मचाऱ्यांना शासनाकडून जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. (latest marathi news)

तरीही संबंधित कार्यकर्ते हे पोलिसांशी हुज्जत घातल होते. त्यानंतर पुन्हा आतमध्ये एका मतदाराला चक्कर आल्याचा बहाणा करून पाणी द्यायचे कारण सांगत आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी स्वत: त्या कार्यकर्त्यासमवेत गेले असता, त्याठिकाणी कोणालाही चक्कर आली नव्हती वा कोणीही पाण्याची मागणी केलेली नसल्याचे निदर्शनास आले.

त्यावरून कर्तव्यावरील पोलिसांनी दोघा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यातील एका कार्यकर्त्याने माजी नगरसेविकेला घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनीही पोलिसांशी हुज्जत घातल अरेरावी केली. घटनेची माहिती मिळताच सेक्टर अधिकाऱ्यांचे भरारी पथक केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी दोघा कार्यकर्त्यांना ताब्यात घेत अंबड पोलिस ठाण्यात नेले. यामुळे केंद्रावर काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT