Crime esakal
नाशिक

Nashik Crime : शहरात 2 घटनांमध्ये प्राणघातक हल्ले; इंदिरानगरला हॉकी स्टीकने तर, देवळालीगावात कोयत्याने हल्ला

Latest Crime News : पाथर्डी फाटा परिसरातील पार्क साईट येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाच्या डोक्यात हॉकी स्टीकने मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील पार्क साईट येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाच्या डोक्यात हॉकी स्टीकने मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसरी घटना देवळाली गावात घडली असून, संशयितांनी दोघा भावांवर कोयत्याने वार करीत प्राणघातक हल्ला केला. आशिष दलोड, सिद्धार्थ सुरेश दलोड, सिद्धांत सुरेश दलोड, सनी हटवाल (सर्व रा. महालक्ष्मी चाळ, द्वारका) अशी संशयितांची नावे आहेत. तर सम्राट चंद्रशेखर गायकवाड (रा. पार्कसाईड, पाथर्डी फाटा) असे जखमी युवकाचे नाव आहे. (Deadly attacks in 2 incidents in city )

निखिल कैलास निकाळे (रा. आम्रछाया कॉलनी, खुटवडनगर) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता.८) रात्री ते त्यांचा साला सम्राट यास भेटण्यासाठी पार्कसाईट येथे गेले. ते पार्किंगमध्येच असताना संशयित त्याठिकाणी आले आणि त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढली. त्यावरून शिवीगाळ करीत सम्राट यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत एकने त्याच्याकडील हॉकी स्टीकने सम्राटच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात संशयितांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक चौधरी हे तपास करीत आहेत.

राहुल सुरेश निकम (२७), कृष्णा उर्फ किशोर सुरेश निकम (२४, रा. गांधी धाम, मनपा वसाहत, देवळाली गाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, दीपक राजाराम पगार (रा. अण्णा भाऊ साठेनगर, देवळालीगाव) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता.८) संशयितांनी जुन्या भांडणांची कुरापत काढून दीपक व त्याचा भाऊ गणेश या दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करीत धमकावले. तसेच, त्यांच्याकडील धारदार कोयत्याने त्यांच्यारव हल्ला करून दीपक यांची चारचाकी गाडी घेऊन गेले. याप्रकरणी उपनगर पोलिसात संशयितांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक भंडे हे तपास करीत आहेत.

जावयाला चाकूने भोसकले

कौठुंबिक वादातून संशयित सासरा व मेहुण्याने एकाला बेदम मारहाण केली असता, बचावासाठी तो पळाला. त्यावेळी संशयितांनी पाठलाग करून त्यास चाकूने भोसकत गंभीर जखमी केले. आसिफ वजीर अन्सारी, मोहम्मद आसीफ अन्सारी (रा. भारतनगर) असे संशयित सासरा व मेहुण्याचे नाव आहे.

रेहान मेहबूब पठाण (रा. नानावली, भद्रकाली) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. ७) रात्री सव्वा नऊच्या सुमारास विनयनगर येथे कौठुंबिक कारणातून संशयितांनी पठाण यांचा भाऊ मोईन मेहबूब पठाण (रा. म्हाडा बिल्िडंग, भारतनगर) यास मारहाण केली असता, तो बचावासाठी वत्सलाभा अपार्टमेंटमध्ये पळाला. त्यावेळी संशयित दोघांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या पोटात चाकू भोसकून त्यास गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivendraraje Bhosale: साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा २५ फूट पुतळा उभारणार: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; शहराच्या वैभवात भर पडणार!

Pune Grand Tour : ‘पुणे ग्रँड टूर’चा आज प्रोलॉग; प्रशासनाकडूनही सायकल स्पर्धेची तयारी पूर्ण

आश्चर्य! डावीकडे नाही तर चक्क उजवीकडे हृदय, ७० व्या वर्षी प्रथमच उघड झाले गुपित; महिलेला डॉक्टरांकडून जीवदान

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषदेचे रणांगण! अर्ज भरण्यासाठी आजपासून झुंबड; पक्षांच्या पातळीवर जोर-बैठकांचा धडाका

Supreme Court Bail Order : आरोपीला चुकून जामीन मंजूर, सुप्रीम कोर्टाने तरीही बदलला नाही आदेश, नेमकं कारण काय ?

SCROLL FOR NEXT