Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: प्रियकराचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करीत बदनामी; प्रेयसीविरोधास सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Cyber Crime News : प्रियकराच्या ६५ वर्षीय वडिलांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलाचे संशयित मुलीशी प्रेमसंबंध होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतरही संशयित प्रेयसीने आपल्या प्रियकराचे व त्याच्या कुटुंबीयांनी सदस्यांचे फोटो मॉर्फ केले आणि ते प्रियकराच्या नातेवाइकांमध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल करीत त्यांची बदनामी केली. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत संशयित प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल झाला. (Nashik ​​Crime Defamation by making lover morphed photos viral case marathi news)

प्रियकराच्या ६५ वर्षीय वडिलांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलाचे संशयित मुलीशी प्रेमसंबंध होते. परंतु ते संपुष्टात आले. त्यानंतर संशयित प्रेयसीने प्रियकराचे व त्याच्याच कुटुंबातील मुलीचे फोटो मॉर्फ करून ते व्हायरल केले. तिच्या या कृत्यामुळे मुलाचे लग्न दोनदा मोडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पीडित प्रियकर आणि मुलगी एकमेकांच्या ओळखीतील असून, ते पंचवटीतील घराजवळच राहतात. मुलगा परराज्यात नोकरीला असून, ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन २०२१ पासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. नंतर त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले होते. प्रेमसंबंध तुटल्याचा राग मनात धरून प्रेयसीने बनावट मेल आयडीद्वारे मुलाचे व्हॉट्सअप फेसबुक प्रोफाइल बनविले. (Latest Marathi News)

मुलीच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट बनवून त्याद्वारे प्रोफाइलवर चॅटिंग व विविध स्टेट्सद्वारे प्रियकराच्या बहिणीचा व इतर नातेवाइकांचा एका कार्यक्रमातील मूळ फोटोचा वापर करून अश्लिल फोटोशी मॉर्फ करून तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. यामुळे बदनामी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सहय्यक निरीक्षक कोरबू तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT