Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या ऐवजावर डल्ला! गंगाघाटावर टोळी कार्यरत; सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरीला

Crime News : गंगाघाटावर चोऱ्या करणाऱ्या या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्रस्त भाविकांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : श्री प्रभु रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीत दररोज हजारो भाविक येतात. पंचवटीतील देवदर्शन व गंगाघाटावर स्नानासाठी भाविकांची गर्दी असल्याने याचा गैरफायदा चोरट्यांनी घेत तब्बल २ लाख ५५ हजार ५०० रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.

तर, कपालेश्वर मंदिराच्या पायथ्याशीच पंचवटीची पोलीस चौकी असतानाही चोरटे भाविकांचा ऐवज चोरून नेत आहेत. गंगाघाटावर चोऱ्या करणाऱ्या या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्रस्त भाविकांनी केली आहे. (Nashik Crime devotees come for Devdarshan robbed news)

पंचवटीतील सीतागुंफा येथे दर्शनासाठी आलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील १ लाखांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. सुजाता लक्ष्मी (७०, रा. कोरटा गेरे, जि. तुमकूर, कर्नाटक) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. २८) दुपारी साडेअकरा - बाराच्या सुमारास त्या दर्शनासाठी सीतागुंफा येथे गेल्या होत्या. त्यावेळी गर्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाखांची सोन्याची पोत चोरून लंपास केली.

तर, गंगाघाटावरील रामतीर्थावर आलेल्या परजिल्ह्यातून आलेल्या शितल मुकेश वाघचौरे (रा. स्वामी विवेकानंद नगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.२८) सायंकाळी सहाच्या सुमारास त्या गंगाघाटावरील रामतीर्थ कुंडावर आल्या होत्या. त्यावेळी गर्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सोन्याची पोत, मोबाईल, रोख रक्कम, बसचे मोफत कार्ड असा २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. (Latest Marathi News)

तसेच, गंगाघाटावरील सांडवादेवी मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या कांचन मनोज कदम (रा. पार्क साईड रेसीडेन्सी, मेट्रो झोन, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. २७) रात्री नऊच्या सुमारास त्या सांडवा देवी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी गर्दीच्या फायदा घेत अज्ञात संशयिताने दागिने व रोकड असा १ लाख ३३ हजारांचा ऐवज लंपास केला. यात सोन्याचे दागिने, मोबाईल, रोकड व कागदपत्रे होती. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाकेच्या अंतरावर चौकी

गंगाघाटावरील श्री कपालेश्वर मंदिराच्या पायथ्याशीच पंचवटी पोलिस ठाण्याची चौकी आहे. याठिकाणी नियमित पोलीसांची नियुक्ती केलेली असते. परंतु बहुतांशी वेळा ही चौकी बंदच असते. तर या चौकीच्या हाकेच्या अंतरावर रामतीर्थ कुंड आहे. तरीही या परिसरात चोरट्यांच्या टोळ्या कार्यरत असून भाविकांच्या ऐवजावर डल्ला मारला जातो. असे असतानाही पोलिसांकडून गंगाघाटावरील चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश आलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miss Universe 2026: भारताची १९ वर्षीय सौंदर्यवती यंदा 'मिस युनिव्हर्स'च्या मुकुटावर नाव कोरणार? जाणून घ्या काजियाचा प्रवास

तीन महिन्यांत चांदी तब्बल १ लाखांनी स्वस्त! आता भाव आणखी कोसळणार की उसळी घेणार?

IND W vs SA W: दक्षिण आफ्रिकेचा भारताविरुद्ध मायदेशात होणाऱ्या ODI, T20I अन् Test सामन्यांसाठी संघ जाहीर; लॉरा वूल्फार्ट कर्णधार

जळगावच्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा संशय! मृतदेहाजवळ नारळ, लिंबू, अंडी अन् दारूची बाटली, घटना CCTV त कैद

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २१ नोव्हेंबर २०२६ ते २७ नोव्हेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT