Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : भीमनगरमध्ये वयोवृद्धावर कोयत्याने हल्ला; भाड्याची खोली खाली करण्यास सांगण्यावरून मारहाण

Nashik News : भाड्याची खोली खाली करण्यास सांगितल्याच्या रागातून संशयिताने एकाला मारहाण केल्यानंतर पुन्हा कोयता घेऊन आला आणि ७० वर्षीय वृद्धावर वार करून त्यांना दुखापत केल्याचा प्रकार घडला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जेलरोड परिसरातील भीमनगर येथे भाड्याची खोली खाली करण्यास सांगितल्याच्या रागातून संशयिताने एकाला मारहाण केल्यानंतर पुन्हा कोयता घेऊन आला आणि ७० वर्षीय वृद्धावर वार करून त्यांना दुखापत केल्याचा प्रकार घडला. सोनू बेद असे संशयिताचे नाव आहे. (Nashik Crime Elderly attacked by koita in Bhimnagar)

उत्तम यशवंत पठारे (रा. धीरज अपार्टमेंट, भीमनगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, पठारे यांचा मुलगा किरण याने बाळा जाधव यांची खोली संशयित सोनू यास भाड्याने दिली होती. वर्ष झाल्याने जाधव यांनी संशयित सोनू यास खोली रिकामी करण्यास सांगितले असताही त्याने केली नव्हती. त्यामुळे जाधव याने किरण पठारे यास सांगितले. (Latest Marathi News)

त्यानुसार, किरण यांनी रविवारी (ता.५) रात्री अकराच्या सुमारास सोनूची भेट घेतली. त्यावेळी त्यास खोली रिकामी करण्यास सांगितले. त्याचा राग येऊन त्याने किरण यांना मारहाण केली. याप्रकरणी किरण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, संशयित सोनू त्यांच्या घरी कोयता घेऊन पुन्हा गेला.

त्यावेळी त्याने किरण यांचे वडील उत्तम पठारे यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT