crime esakal
नाशिक

Nashik Crime News : बांधकाम व्यावसायिकाला मागितली 10 लाखांची खंडणी; संशयिताने दिली साईट बंद पाडण्याची धमकी

Nashik Latest Crime : १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करणार्या संशयिताने शिवीगाळ करीत साईट बंद पाडण्याचीही धमकी दिली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकाला फ्लॅट विक्री करायचे असतील तर १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करणार्या संशयिताने शिवीगाळ करीत साईट बंद पाडण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या घटनेमुळे नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Nashik Crime Extortion of 10 lakhs was demanded from builder marathi news )

नाशिकरोड परिसरातच दोन दिवसांपूर्वी सराईत गुंडांनी एका राजकीय पक्षाच्या उपमहानगर प्रमुखाला प्रचार करण्यासाठी खंडणीची मागणी केल्याची घटना ताजी असतानाच, आता थेट बांधकाम व्यावसायिकालाच खंडणीसाठी धमकी दिल्याच्या प्रकाराने नाशिकरोड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. किशोर भारती असे खंडणीची मागणी करणार्या संशयिताचे नाव आहे. प्रमोद बाळकृष्ण गोरे (रा. शिखरेवाडी, नाशिकरोड) या बांधकाम व्यावसायिकाच्या फिर्यादीनुसार, त्यांची मालधक्का परिसरामध्ये नवीन बांधकाम साईटचे काम सुरू आहे. (latest marathi news)

रविवारी (ता. २१) सकाळी ते बांधकाम साईटच्या ऑफिसमध्ये बसलेले असताना संशयित किशोर भारती त्याठिकाणी आला. त्याने, इमारतीतील फ्लॅट विकायचे असतील तर आम्हाला १० लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी दिली. त्यानंतर संशयित भारती पुन्हा सायंकाळी कार्यालयात आला आणि पुन्हा खंडणीची धमकी देत, खंडणी दिली नाही तर बांधकाम साईट बंद पाडण्याची धमकी देत शिवीगाळ केली.

या घटनेमुळे बांधकाम व्यावसायिक गोरे यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार, संशयिताविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक बिडकर हे तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT