Suspects arrested in case of fake iPhone accessories. including the Special Squad of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : आयफोनची बनावट अ‍ॅक्सेसरीज विक्रेत्यांवर छापे; 4 लाखांची अ‍ॅक्सेसरीज जप्त

Nashik Crime : महागडे आयफोनसाठी लागणारे साहित्य हुबेहुब त्यासारखेच बनावट साहित्याची साठेबाजी करून त्याची बाजारात विक्री.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : महागडे आयफोनसाठी लागणारे साहित्य हुबेहुब त्यासारखेच बनावट साहित्याची साठेबाजी करून त्याची बाजारात विक्री केल्याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने प्रधान पार्कमधील चार दुकानांवर छापे टाकत, सुमार चार लाखांचे बनावट अक्सेसरीज जप्त केली असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात कॉपीराईड ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. (Nashik Crime Fake iPhone accessories dealers raided)

रुपाराम जेठाराम चौधरी (४०, रा. क्रांतीनगर, पंचवटी. मूळ रा. बाडमेर, राजस्थान), बाबुलाल नेथीराम चौधरी (२८, रा. समर्थ व्हिला, क्रांतीनगर, पंचवटी. मूळ रा. पावलिता, जालोर, राजस्थान), दिलीप ढोलाराम बिष्णोई (२६, रा. सदगुरु अपार्टमेंट, गोळे कॉलनी, अशोकस्तंभ, नाशिक. मूळ रा. लियादरा, सांचोरा, राजस्थान), कमलेशकुमार सुजाराम चौधरी (२३, रा. रिद्धीसिदधी अपार्टमेंट.

ओमनगर, पंचवटी. मूळ रा. भीनमाल, जालोरा, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यशवंत शिवाजी मोहिते (रा. नेरूळ, नवी मुंबई) यांच्या फिर्यादीनुसार, आयफोन ॲपल कंपनीच्या मोबाईलचे बनावट ॲक्सेसरीजची नाशिकमधील एम.जी. रोडवरील बाजारपेठेत खुलेआम विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी खात्री केली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी शहर गुन्हेशाखेकडे तक्रार केली. त्यानुसार, शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने एम.जी. रोडवरील प्रधान पार्कमधील चार संशयितांच्या दुकानावर छापे टाकले. त्यावेळी आयफोन ॲपल कंपनीच्या मोबाईलसाठी लागणारे युएसबी केबल, एअरपॉड, इअरपॉड, स्क्रीनगार्ड, ॲडप्टर, बॅक कव्हर आदी ॲक्सेसरीज ओरीजनल आयफोनसाठी लागणारे ॲक्सेसरीजसारखीच बनावट होते. (latest marathi news)

या बनावट ॲक्सेसरीजचा साठा करून संशयितांकडून विक्री केली जात होती. यामुळे कंपनीच्या कॉपीराईट हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला. तसेच, ३ लाख ८६ हजार ५३० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक सुरवाडे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक लाड, रंजन बेंडाळे, गणेश भामरे, भारत डंबाळे, विनायक आव्हाड, अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, बी.व्ही. राऊत, विठ्ठल चव्हाण, अर्चना भड, मंगल जगताप यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

Latest Marathi News Live Update : रुपाली पाटील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

'पुष्पा 2 मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप' प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...'मला ते पाहून धक्काच बसला...'

SCROLL FOR NEXT