Fake IPS esakal
नाशिक

Nashik Crime News : तोतया आयपीएसला पोलिसांनी केले गजाआड! घरातून वर्दीसह कागदपत्रे जप्त

Latest Crime News : शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने छापा टाकत त्याच्याकडून महागड्या मोबाईलसह संशयास्पद कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पाथर्डी फाटा परिसरातून तोतया आयपीएस (भारतीय पोलीस सेवा), रेव्हेन्युसह वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या वर्दीं आणि साहित्य बाळगणाऱ्यास गजाआड करण्यात आले आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने छापा टाकत त्याच्याकडून महागड्या मोबाईलसह संशयास्पद कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. (fake IPS arrested by police Documents seized)

गौरव रामाअछेबर मिश्रा (३४, रा. फ्लॅट १००२, बी विंग, हरीविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा) असे संशयित तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे अंमलदार संजय सानप यांच्या फिर्यादीनुसार, युनिट दोनचे निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना या तोतयाची खबर मिळाली असता, त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयिताला त्याच्या घरातून ताब्यात घेत चौकशी केली.

संशयित वाणिज्य शाखेचा पदवीधर असून विवाहित आहे. तसेच तो आई-वडिलांसह याठिकाणी वास्तव्यास आहे. त्याच्या घरझडतीतून आयपीएसच्या वर्दीसह कागदपत्रेही सापडली आहेत. तसेच, याचा वापर करून त्याने कोणाला गंडविले, शासकीय वर्दी बाळगण्यामागील त्याचा उद्देश, यासंदर्भात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक भूषण सोनार हे तपास करीत आहेत. (latest marathi news)

घरात सापडले

तोतया संशयिताच्या घरातील कपाटातून शासकीय वर्दीसह साहित्य सापडले. स्वयंपाक घरात पोलिसांच्या शासकीय वाहनावरील अंबर दिवा, लाल-निळ्या रंगाचा गोलाकार आणि आयताकृती दिवाही पोलीसांच्या हाती लागला आहे. तसेच, काही ‘एफआयआर’च्या झेरॉक्स प्रती, शंभर रुपयांचे प्रतिज्ञापत्रही हस्तगत केली आहेत.

तसेच, लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचे वीस पानी पत्रही मिळाले आहे. जळगावच्या धर्मदाय सहायक आयुक्तांच्या कार्यालयाने दिलेले नोंदणीचे प्रमाणपत्र, परवाने, कराराची कागदपत्रेही सापडली असून यामागील त्याचा उद्देशाचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच गैरवापर करून कोणाला फसवले आहे का, याचाही पोलीस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

FDA Crime : मंचर बनावटदूध भेसळ प्रकरण; तीन आरोपींच्या घरांची झडती, लॅपटॉप, कागदपत्रे केली जप्त

Shivneri Fort Landslide : किल्ले शिवनेरी येथे शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे वाहून आला मातीचा ढिगारा

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT