crime news esakal
नाशिक

Nashik Crime : त्र्यंबक रोडवर कार अडवून बापलेकास मारहाण करीत लुटले; दुचाकीस्वारांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल

Crime News : या घटनेत काहीतरी हत्यार व दगडाचा वापर करण्यात आल्याने कारमधील दोघे जखमी झाले असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २५ हजारांची रोकड बळजबरीने हिसकावून नेत भामट्यांनी पोबारा केला.

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरी भागात कार अडवून बापलेकास मारहाण करीत दुचाकीस्वारांनी लुटल्याची घटना घडली. या घटनेत काहीतरी हत्यार व दगडाचा वापर करण्यात आल्याने कारमधील दोघे जखमी झाले असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २५ हजारांची रोकड बळजबरीने हिसकावून नेत भामट्यांनी पोबारा केला. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. (father son beaten robbed by blocking car on Trimbak Road)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम व्यकंडी माडे (२७, रा. मुकुंदवाडी, छत्रपत्री संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली. शुभम माडे व त्यांचे वडील पालघर येथे गेले होते. गुरुवारी (ता. १) सायंकाळच्या सुमारास बापलेक त्र्यंबक रोडने स्विफ्ट कारमधून (एमएच २० एफडी ५५१२) परतीचा प्रवास करीत असताना ही घटना घडली.

पपया नर्सरी भागात काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी कार अडवून माडे बापलेकास शिवीगाळ केली. या वेळी खिडकीतून काहीतरी हत्याराने व दगडाने बापलेकास मारहाण करण्यात आली. (latest marathi news)

या घटनेत जखमी बापलेकाच्या खिशातील सुमारे २४ हजार ५०० रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्र बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून, जाताना कारला दगड मारल्याने काच फुटून नुकसान झाले आहे. उपनिरीक्षक न्याहळदे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Crime : PSI चं नाव हातावर लिहून महिला डॉक्टरनं स्वत:ला संपवलं, 'तो' पोलिस अधिकारी निलंबित, आणखी धक्कादायक माहिती समोर येणार!

Kolhapur Market Yard : भाजीपाला व्यापारी व सभापती यांच्यात जोरदार वाद, कोल्हापूर बाजार समितीमध्ये प्रकार; नेमकं काय प्रकरण?

Healthy Lifestyle: निरोगी आरोग्य हवंय? प्रत्येक व्यक्तीने रोजच्या आहारात करा 'या' सुपरफूड्स समावेश!

Pro Kabaddi 12: यू मुंबावर युपी योद्धाज पडले भारी! पराभवामुळे टॉप-४ ची संधीही हुकली

Ayurvedic Tips for Heart: हृदयविकाराचा झटका येऊच नये यासाठी काय करावे? वाचा आयुर्वेद काय सांगत

SCROLL FOR NEXT