Nashik Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : गांजा प्रकरणातील संशयित महिला सापडेना; कारचालकाला पोलिस कोठडी

Nashik News : भारतनगर चौकात पुण्यावरून आलेल्या कारमध्ये १९ लाखांचा गांजा पकडण्यात आल्या होता. याप्रकरणी संशयित कारचालकाला शुक्रवार (ता. १२) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भारतनगर चौकात पुण्यावरून आलेल्या कारमध्ये १९ लाखांचा गांजा पकडण्यात आल्या होता. याप्रकरणी संशयित कारचालकाला शुक्रवार (ता. १२) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, कारमध्ये पुण्याहून नाशिकला गांजा घेऊन आलेल्या महिलेचा पोलिस शोध घेत आहे. परंतु अद्यापही तिचा शोध लागू शकलेला नाही. (Female suspect in ganja case not found Car driver in police custody)

त्यामुळे पुण्यातून गांजा कोणी दिला आणि नाशिकमध्ये तो कोणाला दिला जाणार होता, याचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणीचे ठरते आहे. सोमवारी (ता. ८) सकाळी पुण्याहून संशयितांनी उबेर कॅबच्या माध्यमातून कार बुक केली. या कारमधून संशयित महिला व तिचा साथीदार हे बॅग व गोण्या घेऊन आले होते. कार भारतनगर चौकात थांबवून संशयित महिला व इसम यांनी कारचालकाला हॉल्टिंग चार्ज कबूल करून त्यास थांबण्यास सांगितले.

जाताना महिलेने कारमधील गांजाच्या बॅगा तशाच ठेवल्या होत्या. दरम्यान मुंबई नाका पोलिसांना खबर मिळाली आणि पोलिसांनी कारवाई केली असता, १९ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी कारचालक संशयित किरण धुमाळ (रा. धायरी, ता. पुणे) यास अटक केली आहे. (latest marathi news)

न्यायालयात हजर केले असता त्यास शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संशयित महिला व तिचा साथीदाराचा पोलिस शहर परिसरामध्ये कसून शोध घेत आहेत. कारचालकाला संशयितांसंदर्भात काहीही माहिती नसल्याचे तपासात समोर आले आहे.

संशयितांनी सदरचा गांजा पुण्यातून कोठून आणि कोणाकडून घेतला. तसेच तो गांजा नाशिकमध्ये कोणाला दिला जाणार होता याचा शोध पोलिस घेत आहेत. परंतु अद्याप संशयित महिला व साथीदार हाती लागत नसल्याने या प्रश्नांची उत्तरेही गुलदस्त्यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT