Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : पहिला अदखलपात्र गुन्हा पंचवटीत दाखल! नवीन भारतीय न्याय संहितेची अंमलबजावणी सुरू

Crime News : नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पंचवटी पोलिस ठाण्यात या भारतीय न्याय संहितेनुसार (बीएनएस) पहिला अदखलपात्र गुन्हा सोमवारी (ता.१) सकाळी दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : ब्रिटिशकालिन कायदे आजपासून इतिहासजमा झाले तर, नवीन भारतीय न्याय संहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पंचवटी पोलिस ठाण्यात या भारतीय न्याय संहितेनुसार (बीएनएस) पहिला अदखलपात्र गुन्हा सोमवारी (ता.१) सकाळी दाखल करण्यात आला आहे. (first Indictable offence filed in Panchavati Implementation of new Indian Judicial Code)

भारतीय न्याय संहिता व भारतीय नागरिक न्याय संहिता यानुसार नवीन कायद्यांची आजपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासाठी शासनाकडून पोलीस दलासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशिक्षण सुरू होते.

दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये नवीन भारतीय न्याय संहितेनुसार पहिला अदखलपात्र गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. फिर्यादी प्रियंका कुणाल चांडोले (रा. प्रभात प्राईड अपार्टमेंट, तारवालानगर, पंचवटी) यांनी संशयित पती कुणाल चांडोले याच्याविरोधात तक्रार दिली. (latest marathi news)

संशयित कुणाल मद्यपी असून, त्यासाठी तो सतत पत्नीकडे पैसे मागतो. पत्नीने पैसे न दिल्याने संशयिताने तिला मारहाण करीत घरातून निघून जा, नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकीही दिली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात भारतीय न्याय संहितेनुसार अदखलपात्र गुन्हा सोमवारी (ता. १) सकाळी साडेदहा वाजता दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार! राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला; अमित शाहांनी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं?

Solapur Crime: छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकायदा पुतळा बसवल्याप्रकरणी अंकोलीच्या अकरा जणांवर गुन्हा; शासकीय नियमांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT