Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : माजी नगरसेविकेच्या पतीला गुंडांकडून मारहाण!

Nashik News : वाढदिवस साजरा करण्याच्या कारणातून काही गुंडांनी माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल यांसह तीन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक रोड परिसरातील खर्जुल मळा मोरया पार्क या ठिकाणी एका अल्पवयीनाचा वाढदिवस साजरा करण्याच्या कारणातून काही गुंडांनी माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल यांसह तीन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली आहे.

नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांसह पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. जखमींना उपचारार्थ नाशिक रोड मधील जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. असून अवघ्या काही मिनिटातच जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जखमी नितीन खर्जुल हे माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती असून बांधकाम व्यवसायिक किरण खर्जुल हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती कळताच जयराम हॉस्पिटल बाहेर गर्दी जमली होती. (latest marathi news)

घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता वाढदिवस साजरा करत असताना परिसरात उच्छाद मांडत असल्याने नितीन खर्जुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधितांना समजावण्याचा प्रयत्न केला असता रवींद्र गाढवे व त्याचा भाऊ संदीप गाढवे यासह काही पाच ते सहा अज्ञात संशयतांनी धारदार शस्त्राने संबंधितांवर हल्ला चढवला यामध्ये खर्जुल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.

येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ला करणाऱ्या संशयीतांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT