Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : महिला सुरक्षा शाखेतच ‘फ्रि-स्टाईल’! संशयित पत्नीसह नातलगांविरोधात गुन्हा दाखल

Crime News : याच शाखेत आलेल्या पतीला संशयित पत्नीने मारून दुखापत केली तर नातलगांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पोलीस ठाण्यांकडे येणारे पती-पत्नीतील भांडणाची तक्रारी येतात. त्यासंदर्भात गुन्हा दाखल होण्यापूर्वी महिला सुरक्षा शाखेमार्फत समुपदेशन केले जाते. मात्र याच शाखेत आलेल्या पतीला संशयित पत्नीने मारून दुखापत केली तर नातलगांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Free style in Women Security Branch)

निशा स्वप्निल कुऱ्हे, रवींद्र ढवण, संगीता रवींद्र ढवण अशी संशयितांची नावे आहेत. स्वप्निल रमेश कुर्हे (रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, गारखेडा परिसर, संभाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, पत्नी निशा व त्यांच्यात वाद झाला असून, त्यासंदर्भात २५ जून रोजी त्यांना समुपदेशनासाठी शरणपूर पोलीस चौकी येथील महिला सुरक्षा विशेष शाखेत बोलाविले होते.

त्यावेळी स्वप्निल हा त्याच्या आई-वडिलांसह तर, संशयित पत्नी व दोघे आलेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास महिला सुरक्षा शाखेच्य आवारातच संशयित पत्नी निशा हिने पती स्वप्निल याच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली. (latest marathi news)

तर, संशयित रवींद्र ढवण याने स्वप्निलच्या आईला व वडलांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली तर संशयित संशयित संगीत ढवण हिनेही शिवीगाळ करीत दमदाटी केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात संशयित पत्नीसह तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पाच दिवसांच्या मुसळधार पावसानंतर पुणेकरांना दिलासा; वारीत भाविकांचा उत्साह, पुढील ३-४ दिवस पावसाचा जोर कमी

Hospital loan Fraud in Kolhapur : सेवानिवृत्त शिक्षकाची पावणेसहा कोटींची फसवणूक, 'हॉस्पिटल उभारणी'चे लाटले कर्ज; ठार मारण्याचीही दिली धमकी, तिघांना अटक

Latest Marathi News Live Update : मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावकार्य अद्यापही सुरुच

ओम भूतकरने गुपचूप उरकलं लग्न, पत्नी 'या' क्षेत्रात कार्यरत, लग्नातले फोटो Viral

IND vs ENG : ना वैभव, ना संजू... टीम इंडियाची खरी डोकेदुखी 'दोन' खेळाडूंनी वाढवली; पाचव्या सामन्यातून त्यांची हकालपट्टी निश्चित

SCROLL FOR NEXT