Gambling den esakal
नाशिक

Nashik Crime News : अंबासन येथे डोंगराच्या पायथ्याशी जुगाराचा अड्डा; एक जण ताब्यात

Nashik Crime : पोलिस अधिकारी नितिन गणापूरे यांच्या पथकाने डोंगराच्या कडेला आंब्याच्या झाडाखाली राजरोज सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम जप्त केले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मानूर (ता. बागलाण) येथे उपविभागीय पोलिस अधिकारी नितिन गणापूरे यांच्या पथकाने डोंगराच्या कडेला आंब्याच्या झाडाखाली राजरोज सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम जप्त केले. संबंधिताविरोधात जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एकाला ताब्यात घेण्यात आले असून पिंपळनेर येथील एकाच्या सांगण्यानुसार परिसरातील अनाधिकृत व्यवसायांचे समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. (Gambling den at foothills in Ambasan One person in custody )

गुप्त माहितीनुसार मानूर येथे दोन ते तीन जण मिलन कल्याण नावाचा मटका जुगार खेळवत असल्याचे समजले. पोलिस पथकाने छापा टाकण्यासाठी दोन पंचांच्या मदतीने खासगी वाहनातून थेट मानूर गाठत डोंगरांच्या अलीकडेच वाहन उभे करून पायी गेले. आंब्याच्या झाडाखाली मोकळ्या जागेत दोन जण आकड्यावर पैसे लावून जुगार खेळ खेळताना आढळून आले. साध्या वेशातील पोलिसांनी अनाधिकृत चालणाऱ्या मटका अड्ड्यावर छापा टाकून पकडले, दुसऱ्या एकाने तेथून पळ काढला.

पकडलेल्या जुगार चालकाला पोलिसांनी विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेतली असता राजू मुन्नालाल भोई (रा. पिपळनेर, ता.साक्री) असे सांगितले. मालक सागर कैलास जयस्वाल (रा. पिपळनेर, ता. साक्री) यांच्या सांगण्यावरून मटका चालवत असल्याची कबुली दिली. त्याची झडती घेतली असता दहा हजार एकशेवीस रूपये, आकडे लिहिण्यासाठी पेन, दोन पुस्तक व कार्बन असा ऐवज मिळून आला. अवैध व्यावसायिकांवर कारवाई सुरूच राहणार असे उपविभागीय पोलिस आधिकारी नितीन गणापुरे यांनी सागितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Abu Salem : सुप्रीम कोर्टाने अबू सालेमला फटकारले, याचिक रद्द करत म्हटले- " टाडा अंतर्गत सजा मिळालीय, समाजाचं भल केलं म्हणून नाही"

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

Latest Marathi News Update : पुण्यातील भाजपा आणि काँग्रेस राडा प्रकरण; धीरज घाटे रवींद्र चव्हाणांना भेटणार

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

SCROLL FOR NEXT