Crime esakal
नाशिक

Nashik Crime : कृषीनगर जॉगींग ट्रॅकजवळ टोळक्याचा प्राणघातक हल्ला; वाहनांची तोडफोड

Latest Crime News : जॉगींग ट्रॅकजवळील सिद्धार्थनगर येथे टोळक्याच्या दोन गटात धारदार हत्यारे, लाकडी दांडक्यासह प्राणघातक हल्ला चढविला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषीनगर जॉगींग ट्रॅकजवळील सिद्धार्थनगर येथे टोळक्याच्या दोन गटात धारदार हत्यारे, लाकडी दांडक्यासह प्राणघातक हल्ला चढविला. टोळक्याच्या या हल्ल्यात परिसरातील चार वाहनांचेही नुकसान झाले असून, याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी नऊ संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शांताराम ताठे, चंदू ताठे, संतोष ताठे, गणेश जाधव, शेखर उर्फ गोट्या ताठे, प्रफुल्ल ताठे, सागर जाधव, अमोल जाधव, दीपक जाधव अशी अटक करण्यात आलेल्या टोळक्यातील संशयितांची नावे आहेत. (Gang assault vandalized vehicles near Krishinagar jogging track )

गंगापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सोमवारी (ता. ७) मध्यरात्री सिद्धार्थनगर येथे दोन्ही गटांत काही कारणातून वाद झाल्याने एकमेकांना मारहाण करताना लाकडी दांडे व हत्यारांचा वापर केला. एकमेकांवरील या हल्ल्यात परिसरातील रस्त्यालगत पार्क केलेल्या चार कारचे नुकसान केले.

यात दोन कारच्या (एमएच १५ सीटी ०४७१ व एमएच ०४ बीवाय ८८८२) कारच्या काचा फोडल्या. यासह दोन दुचाक्यांचे (एमएच १५ जेएफ ८९३३ व एमएच १५ एफडी ४८८०) तोडफोड केली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी ९ संशयितांना जेरबंद केले आहे. गुन्ह्याचा हवालदार बागुल हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT