Sarait gangster arrested from Samangaon Road area. A team from City Crime Branch Unit Two. esakal
नाशिक

Nashik Crime News : सामनगावातून सराईत गुंडाला अटक; चार महिन्यांपासून होता पसार

Crime News : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून पसार होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून पसार असलेल्या सराईत गुंडाला सामनगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. (Nashik Crime gangster arrested from Samangaon)

निलेश शंकर शहा (२६, रा. सामनगाव रोड, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित गुंडाचे नाव आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून पसार होता. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार विवेकानंद पाठक, मनोहर शिंदे यांना संशयिताची खबर मिळाली होती. त्यानुसार सामनगाव रोडवरील तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात पोलिसांनी सापळा रचून संशयित निलेश यास अटक करण्यात आली.

७ एप्रिल २०२४ रोजी जेलरोडच्या सानेगुरुजी नगर येथे संशयित राहुल चाफलकर, अभिनव कुर्हे, सागर सूर्यवंशी यांच्यासमवेत निलेश शहा याने नितीन काकडे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हापासून निलेश पसार होता. गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाने त्यास अटक करून उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी अंमलदार विवेकानंद पाठक, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, महेश खांडबहाले, विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, प्रवीण वानखेडे यांच्या पथकाने बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT