Chalisgaon Phata police team checking motorists here. esakal
नाशिक

Nashik Crime News : हुल्लडबाजीला पोलिसांकडून चाप! चाळीसगाव फाट्यावर वाहनांची तपासणी

Latest Crime News : दुचाकीवरून हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर : शहराच्या पूर्व भागातील चाळीसगावकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. शहरातील मोठ्या प्रमाणावर तरुण सायंकाळी भटकंती करतात. दुचाकीवरून हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. (goons caught by police Inspection of vehicles)

पोलिस पथकाने चाळीसगाव फाट्यावर सायंकाळी चार ते सातच्या दरम्यान वाहनांची अचानक तपासणी सुरू केल्यानंतर अनेकांची धावपळ झाली. चाळीसगाव फाटा हा भाग या परिसरातील सर्वाधिक वर्दळीचा परिसर आहे. या हुल्लडबाजी करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचाही दुचाकी वाहन चालवणाऱ्यांचाही समावेश असतो.

शहरातील बाहेरच्या रस्त्यावरून हुल्लडबाज टारगट तरुण मंडळी बरेचदा मोबाईल स्नॅचिंग प्रकरणात सहभागी असतात. वाहन परवाना व कागदपत्रे नसतात. अनेक दुचाकींना नंबर नसणे, नंबर प्लेट चित्र विचित्र असण्याचाही प्रकार समोर येतात. फाटा परिसरात पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांच्या पथकाने बेशिस्त वाहनचालकांची तपासणी करत वाहतुकीचे नियम सांगून शिस्तीचे धडे दिले. या दरम्यान कागदपत्रे, लायसन्स यांची तपासणी केली. (latest marathi news)

विनाहेल्मेट, ट्रिपलसीट वाहन चालकांनाही चोप देत वाहतूक नियमांचे पालन करण्याची तंबी दिली. या तपासणी मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कॉलेज तरुणांचा समावेश असल्याने नेहमीप्रमाणे वरिष्ठ पातळीवर फोन करून सोडवा सोडव करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. जागरूक नागरिकांनी व वाहन धारकांनी या तपासणी मोहिमेचे स्वागत केले असून चाळीसगाव फाटा परिसरातील सर्व रस्त्यांवर अशा तपासणी करून दुचाकी चालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT