crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : मालेगावात 65 हजाराचा गुटखा जप्त; दोघांना अटक, शहरासह ग्रामीण भागात 4 ठिकाणी छापे

Nashik Crime : शहर व परिसरात पोलिसांनी अवैध धंद्यांविरुध्द चार दिवसापासून कारवाईचा बडगा उगारला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहर व परिसरात पोलिसांनी अवैध धंद्यांविरुध्द चार दिवसापासून कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहरी भागात गुटखा, मटका तर ग्रामीण भागात गुटखा व गावठी दारुच्या अड्ड्यांवर छापेमारी केली जात आहे. शहर व तालुक्यात शुक्रवारी (ता.२८) पोलिसांनी चार ठिकाणी छापे घालत सुमारे ६५ हजाराचा गुटखा जप्त केला. या संदर्भात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Gutkha worth 65 thousand seized in Malegaon two arrested)

लुल्ले (ता. मालेगाव) येथील विराणे- लुल्ले रस्त्यावरील हरणशिकारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दीपक नारायण सूर्यवंशी यांच्या एकविरा किराणा दुकानावर पोलिसांनी छापा घातला. दुकानातून केसरयुक्त विमल पान मसाला, व्ही १- तंबाखू पाऊच असा एकूण १२ हजार ७८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिस शिपाई विजय शिंदे यांच्या तक्रारीवरुन वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात दीपक सूर्यवंशी याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दीपकला अटक केली आहे.

शहरातील आयशा हकीम चौकात दुसरी कारवाई करण्यात आली. शेख शोएब शेख रियाजउद्दीन (२१, रा. दत्तननगर) याच्या राजू पान स्टॉलमध्ये पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारचा ४ हजार ८०७ रुपयांचा गुटखा, पानमसाला, तंबाखू जप्त केली. पोलिस शिपाई रोहिदास चव्हाण यांच्या तक्रारीवरुन पवारवाडी पोलिस ठाण्यात शोएबविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

शहरातील रहमताबाद भागातील मोहम्मद रशिद मोहम्मद सादिक (३५, रा. पाटकिनारा, रेहमताबाद) याच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून ४७ हजार ११४ रुपयांचा गुटखा, पानमसाला, तंबाखूच्या पुड्या जप्त केल्या. गुरूवारी (ता.२७) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस शिपाई सचिन राठोड यांच्या माहितीवरून पवारवाडी पोलिस ठाण्यात मोहम्मद राशिदविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अन्साररोडवरील अबुझर पान हाऊसवर चौथी कारवाई करण्यात आली. तारिक अन्वर फरान अहमद (वय २७, रा. अन्सार रोड) यांच्या मालकीच्या अबुझर पान हाऊसवर पोलिसांनी छापा टाकून ९७८ रुपयांचा गुटखा, तंबाखुचा ऐवज जप्त केला. गुरुवारी (ता. २७) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस नाईक अमोल शिंदे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात तारिकविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT