Gambling Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : हॉटेलच्या आडून सोरट; जेलरोडला पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा!

Crime News : जेलरोड परिसरातील दसक येथे हॉटेल व्यावसायाच्या आडून चक्री व सोरट नावाचा जुगार अड्डा सुरू होता.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जेलरोड परिसरातील दसक येथे हॉटेल व्यावसायाच्या आडून चक्री व सोरट नावाचा जुगार अड्डा सुरू होता. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने छापा सदरची कारवाई करीत पाच जुगाऱ्याला अटक केली आहे. (Nashik Crime Police raid Jail Road gambling den news)

शहरातील अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहिम सुरू आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाला जेलरोड परिसरातील दसक येथील हॉटेल जय मल्हार याठिकाणी चोरीछुप्यारितीने जुगार अड्डा सुरू असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, पथकाने या हॉटेलवर छापा टाकला असता त्याठिकाणी चक्री व सोरट नावाचा जुगार खेळला जात असल्याचे दिसून आले. यावेळी पथकाने पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेत, १ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (latest marathi news)

सदरची कामगिरी युनिट दोनचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, विवेकानंद पाठक, विलास गांगुर्डे, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, सुनील आहेर, मधुकर साबळे, राजेंद्र घुमरे, नितीन फुलमाळी, संजय पाटिंदे, महेश खांडबहाले, जितेंद्र वजीरे, तेजस मते, विष्णू गोसावी, योगेश रानडे, सागर आडणे यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress review meeting chaos : बिहार निवडणुकीत दारुण पराभवामुळे दिल्लीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; नेत्यांमध्ये जोरदार वाद!

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

SCROLL FOR NEXT