Two suspects arrested with illegal liquor. including the Special Squad of the City Crime Branch.
Two suspects arrested with illegal liquor. including the Special Squad of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : पोलिसांनी पकडला अवैध मद्यसाठा; शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरात अवैधरीत्या दारू विक्री व साठ्याविरोधात शहर पोलिसांनी करडी नजर ठेवत कारवाई सुरू आहे. याअंतर्गतच शहर पोलिसांच्या विशेष शाखेने तिघांना अटक केली असून त्यात एकाकडून ६० हजारांचा तर, इतर दोघांकडून ५८ हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. (Nashik Crime Illegal liquor stock caught by police marathi News )

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अवैध धंदे, अवैधरीत्या दारू वाहतूक व विक्री, अमली पदार्थ विक्री, साठा व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विशेष पथकाचे अंमलदार देवकिसन गायकर यांना देशी-विदेशी दारूच्या अवैध वाहतुकीची खबर मिळाली होती. पथकाने इंदिरानगरमधील संत सावता माळी मार्गावर सापळा रचून, मारुती कार (एमएच १५ जेएम २६५६) अडवून तपासणी केली.

चालक संशयित रोहिदास रघुनाथ पगारे (५०, रा. जेलरोड) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६३ हजार ६६० रुपयांची देशी-विदेशी मद्यसाठा आणि ३ लाखांची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, नांदूर नाका परिसरातून अवैध मद्याची वाहतुकीची खबर अंमलदार रवींद्र दिघे यांना मिळाली होती.

त्यानुसार, विशेष पथकाने नांदूर नाका परिसरात सापळा रचला. संशयित राहुल श्याम वाघ (३२) याच्याकडून अवैध देशीदारुचा साठा व मोबाईल असा ३२ हजार ८८० रुपयांचा मुददेमाल तर, करण संतोष जगताप (२१, दोघे रा. नांदूरनाका) याच्याकडून अवैध देशीदारुचा साठा व मोबाईल असा ५८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार भरत डंबाळे, रवींद्र दिघे, योगेश चव्हाण, दत्तात्रेय चकोर यांनी कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT