Suspects arrested by Adgaon police. esakal
नाशिक

Nashik Crime News : अवैधरीत्या दारूची वाहतूक करणारे जेरबंद! 2 वाहनांसह 5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Nashik News : अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या संशयितांकडून विदेशी दारू सह दोन वाहनांसह एकूण ५ लाख ३५ हजार ३८० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. (Illegal liquor traffickers jailed)

आडगाव गुन्हे शोध पथकाचे हवालदार दादासाहेब वाघ व नीलेश काटकर गस्त घालीत असताना सोमवारी (ता. १७) तपोवन भागात दोन चारचाकी वाहनातून अवैधरीत्या दारू घेऊन जात असल्याची गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यानुसार आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला.

तपोवन येथील चव्हाण मळा या ठिकाणी होंडा सिटी, छोटा हत्ती दिसून आली. पोलिस येत असल्याचे बघताच या दोन्ही गाडीवरील चालकांनी गाड्या सोडून पळ काढला. सदर गाड्यांची पाहणी केली असता, छोटा हत्ती (एमएच- १५- जेसी- २८१४) या वाहनातून ३० हजार ७२० रुपयाचे विदेशी दारूचे ४ बॉक्स व होंडा सिटी कारमधून (एमएच- १९- क्यु- ९९११) ३४ हजार ५६० किमतीचे विदेशी दारूचे ४ बॉक्स आढळून आले. (latest marathi news)

यात संशयित राकेश ऊर्फ रवी राजू भालेराव (३५, रा. सैलानी बाबा चौक, पंचवटी) व मनोज रमेश खरे (३०, रा. मु. पो. विखरणी, ता. येवला) यांना ताब्यात घेण्यात आले. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रवीण दाइंगडे.

मयूर निकम, हवालदार सुरेश नरवडे, शिवाजी आव्हाड, नीलेश काटकर, ज्ञानेश्वर कहांडळ, दादासाहेब वाघ, अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहिकर, निखिल वाघचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख, वैशाली महाले यांनी ही कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT