A bullock cart came from Himmatnagar on the main road from Mosam river sand in the camp area. esakal
नाशिक

Nashik Crime News : मालेगावात बैलगाडीतून अवैध वाळू उपसा तहसिलदारांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई

Nashik Crime : शहरालगत असलेल्या गिरणा मोसम नदीच्या खोऱ्यात वारंवार अवैध वाळूउपसा केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरालगत असलेल्या गिरणा मोसम नदीच्या खोऱ्यात वारंवार अवैध वाळूउपसा केला जातो. महसूल प्रशासनातर्फे अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. तरीही संबंधित बैलगाडी धारक व इतर छोटेमोठे वाहनधारक जुमानत नसल्याने मंगळवारी (ता. ५) पहाटेच्या सुमारास तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी धडक कारवाई करत बैलगाडी जप्त केली. (Nashik Crime marathi news)

संबंधित बैलगाडीमालक पसार झाले आहेत. दरम्यान, वाळूउपसा करणाऱ्यांचे पुरते धाबे दणाणले आहे. शासनाच्या वाळूचा कर न भरता नदी खोऱ्यात चोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी महसूल प्रशासनातर्फे बैलगाडीसाठी अनेक ठिकाणी अटकाव व अडथळे म्हणून महसूल प्रशासनातर्फे जागोजागी रस्त्यावर खड्डे खोदून ठेवलेले आहेत.

त्या अडथळ्यांची टाळाटाळ करीत दिवसा, रात्री, पहाटे वाळूचोरी व उपसा केला जातो. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. मात्र, वाळूमाफिया महसूल पथकासह यंत्रणेला जुमानत नाहीत. (latest marathi news)

संबंधित अधिकारी व त्या भागातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदार देवरे बेधडक कारवाई केली. दरम्यान, वाळूउपसा व चोरी एवढ्यावर थांबेल का, यासाठी महसूल प्रशासनातर्फे अजून कडक उपाययोजना करून नदीकिनारी होणारा वाळूउपसा रोखण्यासाठी या भागात गस्ती पथके तैनात करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

पोलिस प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

शहर व परिसरातील मोसम व गिरणा या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यात सर्वसाधारणपणे दिवसभरात दीडशेहून अधिक बैलगाडीने वाळूची वाहतूक केली जाते. गिरणा पूल, मालेगाव कॅम्प - हिंमतनगर परिसरातील वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत आहे.

शासनाच्या महसूलची चोरी वाढली आहे. यावर तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या धाडसाचे कौतुक म्हणावे लागेल. मात्र, महसूल पथकासह पोलिस प्रशासनाने यावर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT