Suspect in possession of illegal stock of foreign liquor nabbed by Special Branch of Nashik Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : बेकायदेशीर विदेशी मद्यसाठा जप्त; गुन्‍हे शाखेच्‍या विशेष पथकाने कारवाई करत एकास केली अटक

Crime News : बेकायदेशीररीत्या वाहतूक सुरू असताना पोलिसांनी विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : बेकायदेशीररीत्या वाहतूक सुरू असताना पोलिसांनी विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. गुन्‍हे शाखेच्‍या विशेष पथकाने वाहनचालकाला ताब्‍यात घेताना, त्‍याच्‍या ताब्‍यातील वाहनातून २५ हजार रुपये किमतीचा मद्यसाठ्यासोबत संशयिताच्‍या ताब्‍यातील कार जप्त केली आहे. उपनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. (Nashik Crime Illegal stock of foreign liquor seized marathi News)

याप्रकरणी गुन्‍हे शाखेतील खंडणी विरोधी पथकात कार्यरत असलेले भूषण सोनवणे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात कार चालक मारुती सचिन गव्हाणे (४३, रा. सुमन राज रो- हाउस, शिंदे गाव) याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार बुधवारी (ता. २७) रात्री साडेदहाच्‍या सुमारास उपनगर येथील प्रभाकर भीमराव रामराजे मार्गावरील भारत सरकार मुद्रणालयाच्या भिंतीला लागून कार उभी होती.

गुन्‍हे शाखेच्‍या विशेष पथकाने संशयिताच्‍या ताब्‍यातील मारुती डिझायर (एमएच१५ डीएम ९९७९) या वाहनाची तपासणी केली असता, विनापरवाना विदेशी मद्य साठा विक्रीच्‍या उद्देशाने बाळगतांना आढळून आला. यानंतर त्याला पथकाने अटक करताना त्‍यांच्‍याकडील २५ हजार ९८० रुपये किमतीचा मद्य साठा व दोन लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे.

कारमध्ये लपवला होता साठा

संशयिताने कारच्‍या मागील भागात तसेच डिक्‍कीमध्ये बॉक्‍स ठेवलेले होते. या बॉक्‍समध्ये विविध कंपन्‍यांची बिअर, व्‍हिस्‍की या मद्यप्रकारातील साठा दडवून ठेवलेला होता. अवैधरीत्या विक्रीच्‍या उद्देशाने हा साठा आणला असल्‍याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

SCROLL FOR NEXT