Khair and transport vehicle seized in the jurisdiction of Forest Development Corporation. esakal
नाशिक

Nashik Crime News : खैर लाकडाची अवैध वाहतूक वाहन जप्त; संशयित पसार

Nashik Crime : जिल्ह्यातील पेठ वन विकास महामंडळाच्या राखीव वनक्षेत्रात अवैधरीत्या खैर झाडाची तोड करून वाहतूक करणारे वाहन वन विकास महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जप्त केले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : जिल्ह्यातील पेठ वन विकास महामंडळाच्या राखीव वनक्षेत्रात अवैधरीत्या खैर झाडाची तोड करून वाहतूक करणारे वाहन वन विकास महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जप्त केले. यावेळी खैर तस्कर संशयित विष्णू बन्सी राऊत (रा. खिर्डी ता. सुरगाणा) पळून जाण्यात यशस्वी झाला. पेठ, अंबाझरी वन परीक्षेत्रात वन अधिकारी गस्त करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कक्ष क्रमांक ७८ नवापाडा बीट मधून काही संशयित अवैधरीत्या खैर झाडाची तोड करून वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती. ( Illegal transport vehicle of khair wood seized by police )

यानंतर गस्ती पथकाने या भागात सापळा रचत खैर लाकडाची वाहतूक करणारे एक वाहन अडविले. वनविभागाने वाहन अडविल्याचे कळतात सराईत खैर तस्कर विष्णू राऊत याने वाहन तसेच सोडून पळ काढला. यावेळी पथकाने त्याचा पाठलाग केला. मात्र घनदाट जंगलात पळून जाण्यात तो यशस्वी झाला. यानंतर पथकाने खैर लाकूड आणि महिंद्रा कंपनीची पिकअप जप्त केली. विष्णू बन्सी राऊत याच्यावर वन विभागात वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वीही गुन्हे दाखल झालेले आहेत. (latest marathi news)

वन प्रकल्प विभागाचे विभागीय व्यवस्थापक डॉ. एस.एन. नेवसे, सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी, वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया, बी.डी.शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सी. जे. चौरे, एन.एस.पवार, माधुरी साळुंके, वनरक्षक मंगेश वाघ, के. व्ही. राठोड, जी. एस. म्हस्के, एस. के. बोरसे, दीपक डफळ, डी. एम. खिराडी व डी. पी. बोंबले यांनी ही कारवाई केली.

आपट्याच्या फांद्याखाली लाकूड

खैर लाकडाची तस्करी करताना ते सहजासहजी वन किंवा पोलिसांच्या नजरेस पडून जप्त होवू नये म्हणून खैर तस्कर विष्णू राऊत याने लाकडांवर आपट्याच्या झाडाच्या फांद्या टाकल्या होत्या. मात्र खैराची तस्करी होणार असल्याची पक्की माहिती असल्याने वनविभागाच्या पथकाने ही तस्करी उघडकीस आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयोगाच्या बाजूने उत्तर देत नाही म्हणत भाजपनेही मतदारयादीतला घोळ पुराव्यासह दाखवला, 'सत्याचा मोर्चा'तलाच व्हिडीओ लावला

Women's World Cup : भारतीय महिला संघाचे गाणं ऐकलंत का? चार वर्षांपूर्वी ठरवलं होतं, जेव्हा वर्ल्ड कप जिंकू तेव्हा... Video Viral

Latest Marathi News Live Update : महिला विश्वचषक विजयानंतर सांगलीत जल्लोष

Anil Ambani Assets Seized : ईडीची अनिल अंबानींविरोधात सर्वात मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह देशभरातील हजारो कोटींची संपत्ती जप्त

७० पेक्षा जास्त क्रिकेटर अडकले हॉटेलमध्ये, फायनलआधी आयोजकच फरार; गेल, गुप्टिलसह अनेक दिग्गजांचा स्पर्धेत सहभाग

SCROLL FOR NEXT