Khair Woods Seized esakal
नाशिक

Nashik Crime News : खैराच्या लाकडांची चोरटी वाहतूक; वाहनासह मुद्देमाल हस्तगत

Crime News : वाहनचालकासह वाहन व खैर प्रजातीचे ४१ नग ००.३८५ घनमीटर माल जप्त केला असून, चालकास अटक केली आहे

सकाळ वृत्तसेवा

पेठ : तालुक्यातील गोळसपाडा जंगलातील कुंपन क्रमांक ९६ मधील जंगलातील मौल्यवान खैराच्या लाकडाची कत्तल करून कार (एमएच ४८, एडब्ल्यू २०५३)मधून चोरटी वाहतूक करीत असताना, शुक्रवारी (ता. १५) पहाटे सुमारे चारच्या दरम्यान वन विभागाच्या गस्ती पथकाला आढळून आली. वाहनचालकासह वाहन व खैर प्रजातीचे ४१ नग ००.३८५ घनमीटर माल जप्त केला असून, चालकास अटक केली आहे. (Nashik Crime Illegal transportation of Khair wood marathi news)

झरी आंबे परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड सुरू असून, येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना ती रोखण्यात अपयश येत आहे. याच अधिकाऱ्याच्या कार्यळात झरी जंगलातील खैर लाकूड तस्करांनी दिवसाढवळ्या मशीनच्या सहाय्याने कत्तल करून नेली.

तरीही यावर वरिष्ठांनी कोणतीच ठोस कारवाई केली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने तस्करी होत आहेत की काय, अशी चर्चा होत आहे. लाकूड चोरीत वन विभागच्याच लोकांचा सहभाग असल्याची लोकांत दबक्या आवाजात चर्चा होत आहे. आतापर्यंत जप्तीच्या कारवाया फक्त माहितीच्या आधारवर झाल्या आहेत. (latest marathi news)

केलेल्या कारवाईत आरोपी मिळत नाहीत. एकतर जाणूनबुजून सोडून देतात. नाही तर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाल्याचे दाखवतात, हे स्वत:हून कधीच लाकूड तस्करी थोपविण्याचे काम करत नसून साप निघून गेल्यावर हे जमीन बडवण्याचे काम करीत असतात. माध्यमांनाही माहिती देताना टाळाटाळ केली जाते किंवा खरी माहिती दडवली जाते. तालुक्यातील वन विभागाचे संपूर्ण अधिकारी कर्मचारी बदलण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: गणेशोत्सवात मुंबई वाहतुकीत बदल, नो पार्किंग झोनसह अनेक रस्ते बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cheteshwar Pujara: 'क्रिकेटसाठी तू बरीच तडजोड केलीस, आता...' पुजारासाठी पत्नी पूजाची भावनिक पोस्ट

'वडापाव'मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी; ठरणार प्रसाद ओकचा १०० वा चित्रपट

Video: असं कुठं होतं का राव! US Open स्पर्धेत टेनिसपटूचा राडा, फोटोग्राफरचा व्यत्यय अन् भिडला अम्पायरला; प्रेक्षकांनी दिली साथ

Hartalika Vrat 2025 Marathi Wishes: शिव व्हावे प्रसन्न...! हरतालिकेच्या प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा, वाचा हटके संदेश

SCROLL FOR NEXT