Bike Theft esakal
नाशिक

Nashik Bike Theft : पोलिसांकडून आळा बसेना; दुचाकी चोऱ्या थांबेना

Nashik News : शहर परिसरातून गेल्या दोन दिवसात चार दुचाक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर परिसरातून गेल्या दोन दिवसात चार दुचाक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. दुचाक्या चोरीच्या घटना सातत्याने वाढत असतानाही त्यावर पोलिसांकडून आळा बसू शकलेला नाही. (Incidents of bike theft are continuously increasing)

ज्ञानेश्वर भास्कर साताळे (रा. साकोरे मिग) यांची ३० हजारांची दुचाकी (एमएच १५ डीवाय ३५३३) ३० तारखेला गोदाघाटावरील पोलीस चौकीसमोरून चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागनाथ रघुनाथ गडाख (रा. चांदोरी, नाशिक) यांची ८ हजारांची दुचाकी (एमएच १५ ईव्ही ३३०८) २८ तारखेला दिंडोरी रोडवरील हरि लॉन्सच्या पार्किंगमधून चोरीला गेली.

याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव पुंडलिक शिंदे (रा. जगताप नगर, उंटवाडी) यांची ३० हजारांची ॲक्टिवा मोपेड (एमएच १५ जीएच ११९९) २८ तारखेला सायंकाळी कोनार्कनगर येथील लक्ष्मीनारायण लॉन्सच्या पार्किंगमधून चोरीला गेली.

याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, महेंद्रसिंग बाळासाहेब मगर (रा. उर्जा रेसीडेन्सी, औरंगाबाद नाका, पंचवटी) यांची ३५ हजारांची दुचाकी (एमएच १५ एफएस ८१४२) ३० तारखेला सायंकाळी महिंद्रा शोरुमसमोर पार्क केली असता चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT